Join Whatsapp Group

Join Telegram Group

भारतीय टपाल जीवन विमा योजना’ Postal Life Insurance 2024

भारतीय टपाल विभागात विविध योजना भारतीय डाक विभाग काढत असते. भारतीय डाक नेहमी वेगवेगळया योजना काढत असते. यामध्ये सर्वात जुनी म्हणजे इंग्रजांच्या काळापासून चालू असलेली योजना म्हणजे ‘भारतीय टपाल जीवन विमा योजना’ हा टपाल जीवन विमा भारत सरकार डाक विभाग देत असते.

योजनेचे नाव – भारतीय टपाल जीवन विमा Postal Life Insurance

यात ग्रामीण टपाल जीवन विमा आणि टपाल जीवन विमा असे दोन प्रकार आहेत. ग्रामीण जनतेसाठी ग्रामीण टपाल जीवन विमा (RPLI) आणि सर्व शासकीय कर्मचारी, पदवी डिप्लोमा धारक असे सर्व नागरिकांसाठी टपाल जीवन विमा (PLI) हा प्रकार आहे. सुरुवातीला फक्त सरकारी कर्मचारी यानंच हा जीवन विमा घेता येत होता परंतु यात बदल करत आता सर्व नागरिक जे पदवी किंवा डिप्लोमा धारक असतील ते सर्व या योजनेत पात्र आहेत. या योजनेविषयी सविस्तर माहिती खालील लेखात आहे.

योजनेसाठी वय मर्यादा- १८ ते ५५ वर्ष  

PLI पोस्टल लाइफ इंशोरंस – भारतीय विभागात PLI ची सुरुवात ०१/०२/१८८४ साली झाली. हि योजना अनिवार्य स्वरुपात राज्य विम्याची एक योजना होती. देशातील सर्वात प्राचीन जीवन विमा आहे. सुरुवातीला या विम्याची मर्यादा ४००० होती. मात्र आता यात वाढ होऊन ती ५० लाख इतकी करण्यात आली आहे.

पात्रता / ELIGIBILITY – Postal Life Insurance

  • केंद्र / राज्य सरकारचे सर्व स्थायी अस्थाई आणि कंत्राटी कर्मचारी तसेच केंद्र किंवा राज्य सरकार द्वारा स्थापित विश्वविद्यालये
  • ग्रामीण डाक सेवक, सरकारी अहर्ता पथ संस्था राष्ट्रीयकृत बँक, सरकारद्वारा अधिकृत वित्तीय संस्था, महामंडळे.
  • सुरक्षा कर्मचारी , आसाम रायफल, डॉक्टर, इंजिनिअर, CA, वकील
  • ITBPF, CISF, BSF आणि CRPF इत्यादी असाहित अर्धसैनिक दलाचे स्थायी/अस्थाई कर्मचारी
  • क्षेत्रीय ग्रामीण बँक स्थायी अस्थाई कर्मचारी.
  • सर्व शिक्षक व कर्मचारी
  • सहकारी किंवा अन्य सहकारी संस्थेचे कर्मचारी PLI काढू शकतात.
  • सर्व पदवी धारक आणि डिप्लोमा धारक हे सर्व PLI या योजनेसाठी पात्र आहेत.

पॉलिसी मर्यादा –

विमा पॉलिसि कमीत कमी २०००० रुपये तर जास्तीत जास्त ५० लाख रुपये इतकी आहे. घेतलेली विमा रक्कम हि १०००० च्या पटीत असणे आवश्यक आहे. विम्यासाठी जास्ती-जास्त ३ वारस लावता येतात. विमा रक्कम २० लाखाच्या वरती असल्यास वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे. PLI आणि RPLI मिळून विमा रक्कम ५० लाखापेक्षा जास्त असता कामा नये.

विमा प्रकार –

अनु क्रप्रकार
संतोष (मुदतीचा विमा) EA- ENDOWMENT ASSURANCE
संपूर्ण जीवन विमा योजना WLA- WHOLE LIFE ASSURANCE
परिवर्तनी जीवन विमा योजना CWLA CONVERTIBAL WHOLE LIFE
बाल विमा योजना CHILDREN POLICY
ANTICEPTED EA (MONEY BACK/AEA सुमंगल)
युगल सुरक्षा (संयुक्त विमा योजना)

अश्या प्रकारे भारतीय डाक विभाग विमा देत आहेत. सदर विमा हा पूर्णतः भारत सरकारच्या अधीन आहे. यात कोणत्याही प्रकारची फसवणूक होत नसते. दरवर्षी बोनस जाहीर केला जात असतो त्यानुसार व्याज/बोनस मिळत असतो. विमा घेतल्यानंतर तो चालू ठेवणे आवश्यक आहे. जर विमा बंद किंवा आपले हप्ते भरायचे राहिले तर विमा बंद होतो. व्याज/बोनस मिळत नाही. त्यामुळे आपला विमा नियमित भरून चालू ठेवला पाहिजे. भारत सरकारच्या या विमा प्रकारामध्ये खातेधारकाला विमा संरक्षण मिळत असते. जोपर्यंत आपली पोलिसी चालू आहे तोपर्यंत विमा कवर मिळत असतो.

आवश्यक कागदपत्रे –

सदर विमा घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.

  • भारत सरकारद्वारा जारी केलेला पासपोर्ट
  • १० वी च्या बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्याचे बोर्डाचे प्रवेशपत्र
  • शाळा/महाविद्यालय प्रमाणपत्र
  • संरक्षण दलातील ओळखपत्र
  • सरकारी नोकरी किंवा उपक्रमातील नोकरीचे प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • बोनाफाइड
  • जन्म दाखला
  • विवाह नोंदणी प्रमाणपत्र  

यापैकी कोणतेही एक कागदपत्र प्रमाणित वयाचा दाखला म्हणून घेतले जाते. आणि अप्रमानीत वयाचा दाखला म्हणून

  • जन्मपत्रिका
  • मतदान ओळखपत्र
  • पंचायत समिती किंवा विकास समितीने दिलेला दाखला
  • वाहन परवाना
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • वैद्यकीय प्रमाणपत्र

सुविधा –

विमा धारकाला आपल्या पॉलीसी वरती कर्ज सुविधा घेता येत असते. कर्ज व्याजाने मिळत असते. वार्षिक १०% दराने चक्रवाढ व्याजाने कर्ज मिळते. परंतु त्याची वसुली १२% ने केली जाते. पहिले कर्ज फेडल्याशिवाय दुसरे कर्ज मिळत नाही. ठरलेल्या तारखेस सहामाही व्याज न भरल्यास त्या रकमेवर चक्रवाढ व्याज आकारण्यात येईल दुसर्यांदा आणि त्यानंतर कर्ज विशेस प्रसंगी मंजूर केले जाते अशावेळी पूर्वीच्या कर्जाची रक्कम व्याजासहित कापून घेतली जाते व उरलेली रक्कम देण्यात येते.

सुट –

विमा धारकाला हप्त्याचे आगाऊ हप्ते भरल्यावर काही प्रमाणत सुट दिली जात असते. यात जर १२ महिने आगाऊ हप्ते भरले तर २ टक्के सुट दिली जात आणि सहा महिने आगाऊ हप्ते भरले तर १ टक्के सूट देण्यात येते. थकीत हप्त्याना प्रतिमाह दंड १०० रु ला १ रुपये राहील.

Revival (पुनर्जीवित )-

विमा काढल्याच्या तारखेपासून विम्यास ३ वर्ष पूर्ण झाली नसताना जर विम्याचे ६ महिने हप्ते थकीत झाले असल्यास चालतील आणि ७ व्या महिन्यापासून थकीत असल्यास त्यास मेडिकल करून revival करून घ्यावे लागेल मगच पुढील हप्ते भरता येतील. संपूर्ण विमा कालावधीत कितीही वेळा प्रस्थाव revival करता येईल.

टिप – या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफसला भेट द्या

CISF bharti 2024

1 thought on “भारतीय टपाल जीवन विमा योजना’ Postal Life Insurance 2024”

Leave a Comment