Join Whatsapp Group

Join Telegram Group

PM किसान योजना वर्षाला 12,000 रू. मिळवा | PM Kisan Namo Shetkari New Registration 2024 Online Apply

PM Kisan Yojana

पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ₹6000 रुपये मिळतात, परंतु आता नमो शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना एकूण ₹12000 मिळणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही किंवा ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही, त्यांनी नवीन नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात. नवीन नोंदणीसाठी, शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल आणि “न्यू फार्मर रजिस्ट्रेशन” या पर्यायावर क्लिक करावे लागेल. नोंदणी प्रक्रियेत, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या स्थानानुसार योग्य पर्याय निवडा, म्हणजे ग्रामीण किंवा शहरी भागानुसार. त्यानंतर, आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर भरून, राज्य निवडून कॅप्चा टाकून OTP मिळवण्यासाठी क्लिक करावे. OTP प्राप्त झाल्यानंतर, पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक माहिती भरली जाईल.

PM kisan samman nidhi

डिस्ट्रिक्ट आणि सब डिस्ट्रिक्टची माहिती योग्य भरावी. तुम्हाला तुमच्या शेतीच्या स्थानानुसार जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचे आहे. यानंतर, तुम्हाला तुमच्या कॅटेगरीची माहिती द्यावी लागेल, जसे की तुम्ही जनरल, एससी, एसटी किंवा ओबीसी कॅटेगरीमध्ये आहात का. यानंतर, तुम्हाला तुमच्या शेतीचा प्रकार निवडावा लागेल, म्हणजे तुम्ही स्मॉल फार्मर आहात का (एक ते दोन हेक्टर) किंवा मार्जिनल फार्मर.

तुमच्या आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि पत्त्याची माहिती ऑटोमॅटिकली भरलेली असेल, त्यामुळे तुम्हाला ती तपासून पाहायची आहे. सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे.  यानंतर, तुमची नोंदणी यशस्वी झाली की नाही हे तुम्हाला एक पुष्टीकरण संदेश मिळेल.

या प्रक्रियेत, शेतकऱ्यांना त्यांच्या माहितीची अचूकता सुनिश्चित करणे आवश्यक आहे, कारण कोणतीही चूक त्यांच्या नोंदणीसाठी अडथळा ठरू शकते. योजनेचा लाभ घेण्यासाठी, शेतकऱ्यांनी वेळेवर नोंदणी पूर्ण करणे महत्त्वाचे आहे, कारण योजनेच्या अंतर्गत दिले जाणारे हप्ते निश्चित कालावधीतच वितरित केले जातात.

Step 3

 तुम्हाला रेशन कार्डचा बारा अंकी नंबर टाकायचा आहे. हा नंबर कसा मिळवायचा यासाठी, तुम्ही “मेरा रेशन” हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचे आहे.. ॲप डाउनलोड झाल्यानंतर, तुम्हाला ते ओपन करून आवश्यक परवानग्या द्याव्यात. इंटरनेट एक्सेससाठी परवानगी देऊन, तुम्ही ॲपमध्ये प्रवेश करू शकता.

ॲप ओपन केल्यानंतर, तुम्हाला तीन डॉट्सवर क्लिक करून भाषा बदलण्याचा पर्याय मिळेल. तुम्ही मराठी, हिंदी किंवा इंग्लिशमध्ये भाषा निवडू शकता. इंग्लिश निवडल्यानंतर, तुम्हाला आधार सीडिंगचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करून, तुम्हाला रेशन कार्ड नंबर आणि आधार नंबर यामध्ये एक निवड करावी. आधार नंबर निवडल्यावर, तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आणि सबमिट करावे.

सबमिट केल्यानंतर, तुम्हाला रेशन कार्डचा बारा अंकी नंबर दिसेल, जो तुम्हाला नोंदणी प्रक्रियेत आवश्यक आहे. हा नंबर तुम्हाला लँड रजिस्ट्रेशन आयडीसह भरायचा आहे. यानंतर, तुम्हाला इतर आवश्यक माहिती जसे की बँक खात्याचा नंबर आणि इतर दस्तऐवजांची माहिती भरावी. या सर्व प्रक्रियेनंतर, तुम्ही तुमची नोंदणी पूर्ण करू शकता आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता प्राप्त करू शकता.

Step 4

तुम्हाला इथे बारा अंकी रेशन कार्ड नंबर टाकून घ्याचा आहे.. जन्मतारीख ऑटोमॅटिक आलेली आहे, त्यानंतर तुम्हाला विचारेल एक्सेप्टन्स फॉर पीएम किसान मानधन योजना हा एक ऑप्शन नवीन यामध्ये ऍड झालेला आहे. आता पीएम किसान मानधन योजना आहे, ज्यामध्ये तुमच्या अकाउंट मधून काही पैसे कट होतील आणि तुम्हाला 60 वर्षानंतर काही पेन्शन सुरू होईल. ही स्कीम आहे, जर या स्कीममध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर तुम्ही “यस” करू शकता. पण “यस” केल्यावर लक्षात ठेवा, तुमच्या अकाउंट मधून पैसे कट होतील दर महिन्याला, जे काही तुमचं वय आहे त्या वयाच्या नुसार. जर याचा लाभ घ्यायचा असेल तर “यस” करा, नसेल लाभ घ्यायचा तर तुम्ही “नो” करा.

तर हा नवीन ऑप्शन तुम्हाला समजला असेल, “यस” किंवा “नो” करा. पुढचा ऑप्शन आहे ओनरशिप लँड होल्डिंग. जर शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावरती जमीन आहे, त्याच्यावर कुणाचा हक्क नाही, तर सिंगल ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. दुसरा आहे जॉईंट ऑप्शन, ज्या शेतकऱ्याच्या सातबारामध्ये नावं आहेत आणि कुटुंबातली पण भरपूर नावं आहेत, आणि त्यामध्ये सामायिक क्षेत्र असं लिहिलेलं असेल, तर त्यांनी जॉईंट ऑप्शन सिलेक्ट करा. हे झाल्यानंतर खाली “ऍड”चा ऑप्शन दिसेल, त्या “ऍड” बटनावर क्लिक करा.

आता आपल्याला जी काही सातबारा वरची माहिती आहे, शेतीच्या सातबारा जो आहे, त्याची माहिती द्यायची आहे. सर्वे नंबर, खासरा नंबर विचारतंय. खाता नंबर विचारतंय, खाते नंबर तुम्ही काय टाकणार तर इथे तुम्हाला यायचं आहे आठ अ  डाउनलोड करायचा आहे. आठ अ काढून घ्या, आठ अ काढल्यानंतर तुम्हाला खाते क्रमांक असं दिसेल. खाते क्रमांक आणि खाते नंबर इथे दिसेल. आठ अ वरती जो खाते नंबर आहे, तो येथे आहे तसा तुम्हाला पीएम किसानच्या वेबसाईटवर टाकायचा आहे. कुठे टाकायचा आहे, इथे सर्वे किंवा खाता नंबर दिसतोय, इथे तुम्हाला खाते नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला विचारेल इथे “डॅग खासरा नंबर”. आता इथे तुम्हाला काय टाकायचं आहे, तर इथे सातबारा डाउनलोड करून घ्या, डिजिटल सातबारा. त्याच्यामध्ये भूमापन क्रमांक व उपविभाग यांची माहिती भरावी लागेल.

PM Kisan Kyc

हा जो नंबर आहे सर्वे नंबर तो तुम्हाला इथे गट नंबर टाकायचा आहे. हे तुमचं झालेलं आहे तर सर्वे खास खाता नंबर कोणता टाकणार. हा जो आठ आहे, आठ वरती जो खाते क्रमांक आहे, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि गट नंबर कुठला टाकणार तर भूमापक क्रमांक व उपविभाग हा नंबर एक इथे टाकणार असे दोन्ही ऑप्शन तुम्हाला समजले असतील. आता एरिया इन हेक्टर हेक्टर मध्ये एरिया टाकायचा आहे. जो डिजिटल सातबारा तुम्ही डाऊनलोड केलेला आहे, त्यामध्ये इथे पहा एकूण क्षेत्र कुठे दिसतंय. तुम्हाला आता इथे पहा एकूण हेक्टर कुठे एकूण क्षेत्र कुठे दिसतंय तर इथे चेक करा.

आता पहा एकूण क्षेत्र हा तर हा ऑप्शन तुम्हाला दिसेल. एकूण क्षेत्र एकूण क्षेत्र जिथे लिहिलंय त्याच्यापुढे जेवढं लिहिलंय, तेवढंच जे काही जमीन आहे जी काही शेती आहे, ती हेक्टर आणि आर मध्ये टाकायची. आता एक पॉईंट जे काही 70 दिलेला आहे, तर ते इथे मी टाकतोय तुमच्या सातबारा मध्ये जसं असेल ते तुम्ही इथे टाकू शकता. —- टाकल्यानंतर आता लँड ट्रान्सफर स्टेटस लँड ट्रान्सफर स्टेटस काय ऑप्शन आहे तर इथे जर जमीन 1/2 2019 पूर्वी तुमच्या नावावरती म्हणजे शेतकऱ्याच्या नावावरती झाली असेल, तर हा पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि 1/2 /2000 नंतर झालं असेल तर खालचा ऑप्शन पण पहिलाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ज्यांची जमीन 1/2 /2019 च्या अगोदर नावावरती असेल, तेच फक्त एलिजिबल आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर आता लँड ट्रान्सफरचं डिटेल्स आता डिटेल्स काय आहे. डेथ ऑफ हजबंड, आता ही जमीन तुम्हाला कशी मिळाली हजबंडचा मृत्यू म्हणजे पतीचा मृत्यू झाला किंवा डेथ ऑफ फादर, वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर भेटलेली आहे किंवा विरासत मध्ये म्हणजे अशी मुलाला भेटली. त्यानंतर त्याच्या मुलाला, त्याच्यानंतर त्याच्या मुलाला अशी विरासत मध्ये भेटली असेल.

त्यानंतर परचेस केली असेल 2019 पूर्वी तर परचेस त्यानंतर गिफ्टेड केली असेल कोणी तर गिफ्टेड मध्ये येणार आहे. असे ऑप्शन दिलेले आहेत. जे काही ऑप्शन असतील तुम्हाला कशी जमीन 2019 पूर्वी तुम्ही घेतली असेल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता किंवा 2019 पूर्वीच जे नावावरती झाली असेल तरच लाभ घेऊ शकता, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे इथे आता मी समजा डेथ ऑफ फादर म्हणजे फादरची डेथ

झाल्यामुळे मला जमीन भेटलेली आहे असा ऑप्शन मी सिलेक्ट केला तर लक्षात ठेवा खाली तुम्हाला फादरचा म्हणजे आजोबांचा इथे आधार नंबर विचारला जातो. डेथ ऑफ फादर म्हणजे वडिलांचा आधार नंबर ज्या शेतकऱ्याचा फॉर्म भरताय, तर आधार नंबर नसेल तर डायरेक्ट विरासत मध्ये भेटली असा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. विरासत म्हणजे अशी भेटतच जाते मुलाला, मुलाकडून परत त्याच्या मुलाला, तर त्यासाठी इथे सिलेक्ट करायचा आहे.

आता पुढचा आहे इथे जो काही फेरफार नंबर आहे, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. लँड डेट वेस्टिंग इथे जो फेरफार क्रमांक सातबारा वरती दिलेला आहे, राईट साईडला तुम्हाला हा फेरफार क्रमांकाच्या इथे दिनांक आहे. फेरफार क्रमांकाच्या शेजारी जो दिनांक आहे, तो इथे डेट इथे तुम्हाला टाकून घ्यायची आहे. लक्षात ठेवा काय काय जे काय सांगितलंय, लँड डेट वेस्टिंग इथे टाकून घ्यायची आहे.

त्यानंतर आता आर एफ ए नंबर जर असेल तर तुम्ही यस करू शकता, अन्यथा डायरेक्टली नो ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला ही जमीन जी आपण टाकली, ते ऍड बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपण जी काही माहिती ऍड केलेली आहे शेतीची जमिनीची, तर इथे तुम्हाला दिसेल पाहू शकता. वरती मी जी काही माहिती भरलेली आहे, गट नंबर असेल, खाते नंबर असेल, किती हेक्टर मध्ये आहे जमीन, तुम्हाला कशी भेटली आणि कधी फेरफार झालेला आहे, ती माहिती सगळी टाकलेली आहे.

अजून काही जर जमीन असेल तर सेम प्रोसेस मध्ये तुम्ही अजून माहिती टाकू शकता. अजून काही जमीन नसेल तर डायरेक्ट आता डॉक्युमेंट अपलोड करायचे. डॉक्युमेंट्स मध्ये फक्त तुम्हाला लँड म्हणजे काय सातबारा फक्त अपलोड करायचा आहे. आता सातबारा तुम्ही पीडीएफ स्वरूपामध्ये अपलोड करायचा आहे. त्याची जी साईज आहे, ती शंभर केबी पर्यंतच पाहिजे. चूज फाईल वरती क्लिक करायचा आहे. जो काही डिजिटल सातबारा आहे, तोच अपलोड करायचा आहे. डिजिटल सातबारा काढून घ्या पंधरा रुपयांमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने काढून भेटेल. तर हा डिजिटल सातबारा इथे अपलोड करायचा आहे. साईज जर जास्त असेल तर या सातबारा ची साईज कमी करण्यासाठी… येथे क्लिक करा

PM Kisan Aadhaar link status

तर आपण येऊयात पुन्हा या साईटवरती चूज फाईलवरती क्लिक करायचंय. सातबारा जो होता, तो इथे आपण अपलोड केला आहे आणि त्यानंतर आता सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आता आपला फॉर्म इथे कम्प्लीट झालेला आहे. जसं तुम्ही सेव्ह कराल, तर तुम्हाला एक इथे फार्मर आयडी भेटेल. हा याचा जो फोटो काढून घ्या किंवा याचा जो स्क्रीनशॉट आहे, तो काढून घ्या. फार्मर आयडी तुमचा भेटलेला आहे म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन आता झालेलं आहे.

रजिस्ट्रेशन झालंय का नाही याचं स्टेटस तुम्ही आता पाहू शकता. स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला पुन्हा पीएम किसानच्या वेबसाईटवरती यायचं आहे. पीएम किसानच्या वेबसाईटवरती पुन्हा आल्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे पहा, तीन नंबरचा ऑप्शन आहे फार्मर कॉर्नरमध्ये, स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर फार्मर ऑर सीएससी फार्मर्स हा जो तीन नंबरचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचा आहे. जे काही तुम्ही आता रजिस्ट्रेशन केलं होतं, त्या शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आहे.

त्यानंतर इथे कॅप्चा आहे, तो आहे तसा टाकायचा आहे आणि सर्च बटनावरती क्लिक करायचं. तुम्ही तुमच्या समोर इथे पाहू शकता, आता जे रजिस्ट्रेशन केलं होतं, त्याची सगळी माहिती डिटेल्स इथे दाखवली जाईल आणि कधी रजिस्ट्रेशन केलं, त्याची तारीख सुद्धा दाखवली जाईल. तसेच स्टेटस काय आहे, आत्ता ते खाली दाखवलं जाईल. आता स्टेटस काय दाखवते, पेंडिंग फॉर अप्रूवल सब डिस्ट्रिक्ट ब्लॉक लेव्हल म्हणजे आता सब डिस्ट्रिक्टला डिस्ट्रिक्ट लेव्हलला म्हणजे तहसीलमध्ये अगोदर जाईल.

तहसीलमध्ये कृषी अधिकारी अप्रूवल करतील, त्यानंतर ते कलेक्टर ऑफिसमध्ये जाईल आणि कलेक्टर ऑफिसमधून अप्रूवल भेटेल. त्यानंतर इथे तुम्हाला हे अप्रूव्ड झाल्यानंतर हप्ता मिळायला सुरुवात होईल.

Step 5

तर अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं होतं आपल्या मित्रांनो. या प्रक्रियेत तुम्हाला आवश्यक कागदपत्रे आणि माहिती व्यवस्थित तयार ठेवावी लागेल. यामुळे तुम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही तुमच्या बँक खात्यात हप्ता येण्याची प्रतीक्षा करू शकता.

तुमच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना या प्रक्रियेची माहिती देणे महत्त्वाचे आहे, कारण यामुळे त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे, ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारता येईल.

तुम्ही या माहितीचा वापर करून तुमच्या शेतकऱ्यांच्या मित्रांना मदत करू शकता, जेणेकरून तेही या योजनेचा लाभ घेऊ शकतील. या प्रक्रियेत कोणतीही अडचण आल्यास, तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता.

Leave a Comment