Join Whatsapp Group

Join Telegram Group

(CISF bharti 2024) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1130 जागांसाठी भरती

CISF Bharti 2024 – Central Industrial Security Force. CISF Recruitment 2024 (CISF Bharti 2024) for 1130 Constable/Fire (Male)

Posts.www.jobcy.in

cisf bharti
cisf bharti

नमस्कार, केंद्र सरकारच्या औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये सुमारे ११३० पदांसाठी खूप मोठी भरती काढली आहे. सदर भरती हि कॉन्स्टेबल आणि फायरमन या पदाकरिता काढली असून त्यासाठी सविस्तर जाहिरात काढण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर सादर करावा. केंद्र सरकारच्या पोलीस विभागात काम करण्यासाठी आवड असणाऱ्या विद्याथ्यानी आपला फॉर्म भरून घ्यावा. फक्त पुरुष उमेदवारांसाठी सदर भरती काढण्यात आली आहे. या भरती प्रक्रियाची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

Central Industrial Security Force. CISF Recruitment 2024

पदाचे नाव – कॉन्स्टेबल/फायरमन (CISF)

शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी किंवा अर्ज प्राप्त होण्याच्या दिवसापूर्वी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून त्यांची 12 वी किंवा समकक्ष पात्रता वैज्ञानिक विषयासह पूर्ण केलेली असावी.

  • केवळ पुरुष उमेदवार पात्र आहेत.

नागरिकत्व – उमेदवार भारतीय नागरिक असावा.

वयोमर्यादा – किमान वय-१८ वर्ष कमाल वय-२३ वर्ष

वेतनश्रेणी – लेवल-३ २१७००-६९१००रु

अर्ज फी – General/OBC – 100 रु.,SC/ST – फी नाही.

Online अर्ज Starting31 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 30 सप्टेंबर 2024 (11:00 PM )

सविस्तर जागांचा तपशील खालीलप्रमाणे –

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील (CISF) जारी केलेल्या परिपत्रकानुसार सदर भरती विविध राज्यातील असून सर्व राज्यातील रिक्त पदांसाठी सदर भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यापैकी महाराष्ट्र राज्यासाठी ७२ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या जागांमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत कारण या जागा तात्पुरत्या असून यामध्ये वाढ होणार आहे. यामध्ये आपण महाराष्ट्र आणि गुजरात आणि इतर राज्यातील जागांचा तपशील बघणार आहोत. रिक्त जागांचा कॅटेगरी नुसार तपशील खालीलप्रमाणे आहे.

अनु क्र. राज्य UR EWS SC ST OBC TOTAL
१.        महाराष्ट्र ३२ १६ ६१
२.         गुजरात १३ ३२
३.        अंदमान आणि निकोबार
४.      आंध्रप्रदेश १३ ५  ३२
५.       अरुणाचल प्रदेश ०  १० १५
६.        आसाम ७१ १७ ११ २० ४५ १६४
७.       बिहार २६ ९  १५ ५६
८.       चंदिगढ  ०  ०
९.        छत्तीसगढ २३ १७ ५५
१०.    दादरा नगर हवेली आणि दिव दमन
११.    दिल्ली
१२.    गोवा
१३.    हरियाना १४
१४.  हिमाचल प्रदेश
१५.   जम्मू आणि काश्मीर २८ १८ ६५
१६.    झारखंड १९ १३ ४७
१७.   कर्नाटक १३ ३३
१८.   केरळ १७ ३७
१९.    लदाख
२०.   लक्ष्यद्वीप
२१.    मध्य प्रदेश २३ १० ५६
२२.   मणिपूर १६
२३.   मेघालय १२ २२
२४.                          मिझोरम
२५.   नागालेंड १५
२६.   ओडीसा २३ १४ १३ ६४
२७.  पदुचेरी
२८.    पंजाब १५
२९.   राजस्थान १५  ३७
३०.   सिक्कीम
३१.    तामिळनाडू १७ ११ ३९
३२.   तेलंगाना १० २६
३३.   त्रिपुरा १३ २६
३४.                          उत्तर प्रदेश ४४ ११ २३ २९ १०८
३५.   उत्तराखंड १ 
३६.   वेस्ट बंगाल २२ १३
एकूण ४६६ ११४ १५३ १६१ २३६ ११३०

अशा प्रकारे संपूर्ण भारतातील राज्यनिहाय जागा काढल्या आहेत. वरील जागा या Tentative स्वरूपाच्या असून यामध्ये वाढ होणार आहे. केंद्रीय औदोगिक दलाच्या official website ला सदर माहिती अपडेट केली जाईल तरी वेबसाईट ला भेट देत राहावी.

cisf bharti Age Limit –

३०/०९/२०२४ पूर्वी उमेद्वाराचे वय १८ वर्ष पूर्ण झाले असावे. जास्तीत जास्त २३ वर्षपर्यंत पात्र उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे. Sc/ST साठी ५ वर्ष, OBC साठी ३ वर्ष , Exsm साठी ३ वर्ष सूट दिलेली आहे.

शारीरिक क्षमता चाचणी (PET)-

५ किमी धावणे – २४ मिनिट

शारीरिक तपासणी चाचणी (PST)- cisf bharti height

जे उमेदवार शारीरिक तपासणी चाचणी आणि उंची अहर्ता पूर्ण करतील त्यांना शारीरिक तपासणी चाचणी साठी बोलावले जाईल. शारीरिक अहर्ता खालीलप्रमाणे आहे.

उंची १७० सेमी
छाती ८०-८५ सेमी

 शारीरिक तपासणी चाचणी आणि शारीरिक क्षमता चाचणी फक्त Qualify होणे आवश्यक आहे, फायनल मेरीट लिस्ट मध्ये याचे गुण धरले जात नाही.

cisf bharti 2024 syllabus

Exam pattern – CBT Mode

जे उमेदवार PET आणि PST यामध्ये पास होतील त्यांनाच या CBT Based पेपर साठी ग्राय्ह धरले जातील. १०० गुणांसाठी सदर परीक्षा घेतली जाईल. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे-

भाग विषय प्रश्न संख्या कमाल गुण वेळ
भाग-१ सामान्य बुद्धिमत्ता चाचणी २५ २५
भाग-२ सामान्य ज्ञान २५ २५
भाग-३ अंकगणित २५ २५
भाग-४ सामान्य इंग्रजी/हिंदी २५ २५

 

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी PDFयेथे पाहा

अर्ज करण्यासाठी –  Apply Online

 

 cisf bharti 2024 online apply –

अर्जदाराने ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज सादर करावा. ऑफलाईन स्वरूपातील कोणाचेही अर्ज स्वीकारले जाणार नाही. यासाठी CISF च्या Official Website – https://cisfrectt.gov.in यावरून आपला अर्ज करावा.

अर्ज करण्यासाठी जर तुमची अगोदर नोंदणी केली नसेल तर सर्वात आधी तुमची नोंदणी करून घ्यावी. त्यानंतर फॉर्म काळजीपूर्वक भरावा. फोटो क्लिअर आणि ३ महिन्याच्या आतील द्यावा जुना फोटो देऊ नये. सहीचा फोटो क्लिअर काढून अपलोड करावा. आवश्यक मूळ  कागदपत्रे अपलोड करावी झेरोक्ष कागपत्रे चालणार नाही, तुमचा फॉर्म बाद केला जाऊ शकतो.योग्य pdf साईज मध्ये क्लिअर फोटो अपलोड करावा. फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक ३०/०९/२०२४ आहे.परंतु शेवटच्या दिवसाची वाट न बघता आपला फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यावा. शेवटी website सुरळीत चालत नाही. फॉर्म सबमिट करण्याच्या अगोदर सर्व माहिती तपासून मगच फॉर्म सबमिट करावा. उमेदवाराने आपला स्वतः चा इमेल आणि मोबाईल नं द्यावा. सर्व माहिती तपासून फॉर्म सबमिट करावा. भरून झालेल्या फॉर्मची प्रिंट काढून ठेवावी.

cisf bharti 2024 last date –

जर फॉर्म भरताना आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी काही काळ दिला जाईल. दिनांक १०/१०/२०२४ ते १२/१०/२०२४ या दोन दिवसात आपल्या चुका दुरुस्त करून परत फॉर्म सबमिट करावा. याकालावधीत नवीन नोंदणी केली जाणार नाही, फक्त ज्या उमेदवारांनी अगोदर फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठीच सदर कालावधीत website चालू करण्यात येणार आहे.

cisf bharti Admit card –

Admit card हे प्रत्येक स्थरासाठी cisf च्या official website वरती दिले जाईल. उमेदवाराने ते वेळोवेळी website ला भेट देऊन आपले परीक्षापत्रक download करून घ्यावे. वैयक्तिक email किंवा पोस्टाने पाठवले जाणार नाही.   

cisf bharti SELECTION PROCESS  –

PET PST जे उमेदवार पास होतील त्यांना लेखी पेपर साठी सिलेक्ट केल जाईल. लेखी परीक्षेसाठी UR/EWS/ESM साठी ३५% आणि SC/ST साठी ३३% गुण आवश्यक आहे. मिळालेल्या गुणांच्या आधारावर फायनल मेरीट लिस्ट लावली जाईल. जर उमेदवाराला सारखेच मार्क आले तर त्यामध्ये वयानुसार सिलेक्शन केल जाईल. पुन्हा सारखेच जन्म दिनांक आले तर उमेदवाराच्या उंचीनुसार सिलेक्शन केल जाईल. तरीसुद्धा सिलेक्शन करताना अडचण आली तर उमेदवारांच्या शिक्षणावरून त्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.

फायनल मेरीट लिस्ट हि cisf  च्या official website – https://.cisfrectt.cisf.gov.in वरती लावण्यात येईल.     

 

 

Leave a Comment