Join Whatsapp Group

Join Telegram Group

MAHA TET Admit Card Download 2024; शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र असे करा डाउनलोड, १० नोव्हेंबर रोजी होणार पेपर

MAHA TET Admit Card-

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिक्षक पात्रता परीक्षा(MAHA TET Admit Card) येत्या १० नोव्हेंबर रोजी होणार असून या परीक्षेचे Admit Card आता विद्यार्थ्याना डाउनलोड करता येणार आहे. सुमारे ३ वर्ष नंतर शासनाने काढलेल्या या भरती साठी राज्यभरतून विद्यार्थ्यांचे सुमारे तीन लाख ५२ हजार ९३७ अर्ज आले होते. याचे Admit Card आता उमेदवारांना डाउनलोड करता येणार आहे.

या Maha TET 2024 साठी पेपर-१ च्या तुलनेत पेपर-२ साठी अधिक अर्ज आल्याचे समजते. परीक्षा या नियमित जाहीर केलेल्या तारखेलाच होणार आहेत. परीक्षा प्रकारात होणार गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीवि आणि बायोमेट्रिक यांचा उपयोग केला जाणार आहे.

या परीक्षेचे Admit Card (MAHA TET Admit Card) दिलेल्या वेळापत्रक नुसार ऑनलाइन प्रिंट काढणे दिनांक २८ ऑक्टोबर पासून चालू झाले आहे. तर हे अॅडमिट कार्ड दिनांक १० नोव्हेंबर पर्यन्त डाउनलोड करता येणार आहे. विद्यार्थ्याना मागील काही दिवसापासून हे Admit Card डाउनलोड करण्यास अडचण येत आहे,त्यांनी खालील दिलेल्या लिंक वरुण आपले अॅडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचे आहे. काही सोप्या स्टेप्स करून तुमचे Admit Card डाउनलोड करता येणार आहे.

MAHA TET Admit Card 2024; TET प्रवेशपत्र डाउनलोड कसे करायचे?

  • सर्व प्रथम अधिकृत पोर्टल https://mahatet.in/ या पोर्टल वरती जायचे आहे.
  • यानंतर log in वरती क्लिक करायचे आहे.
  • यानंतर तुमचं यूजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन केल्यावर तुम्हाला तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे.

MAHA TET महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४

परीक्षा१० नोव्हेंबर २०२४
प्रवेश पत्रClick Here
१० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ साठी चे हॉल तिकीट तुम्हाला एक क्लिक वरती इतर कुठेही न जाता वरील लिंक वरती क्लिक करून आपला मोबाइल क्रमांक आणि अर्ज क्रमांक टाकून प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे.
पेपरचे वेळापत्रक-

१० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा करिता सकाळच्या सत्रामध्ये सकाळी १०.३० ते ०१.०० दरम्यान होणार आहे. त्यानंतर दीड तासाचा ब्रेक दिला जाणार आहे. आणि पेपर-२ हा दुपारी ०२.०० ते ०५.०० पर्यन्त होणार आहे.

महाराष्ट्र राज्यातून विविध शहरात होणाऱ्या या परीक्षेकरीत सुमारे १०२९ परीक्षा केंद्रावर सदर परीक्षा घेतली जाणार आहे. यात पहिल्या पेपर साठी सुमारे एक लाख ५२ हजार ५९७ विद्यार्थ्यानी नोंदणी केली होती तर पेपर-२ साठी दोन लाख एक हजार ३४० विद्यार्थ्यानी नोंदणी केली होती.

नोकरी अपडेट – NICL Bharati 2024; ६२,२६५ रु महिना पगार!!! महाराष्ट्र नॅशनल इन्शुरन्स कंपनी मध्ये पदभरती

Leave a Comment