NAICL Recruitment
नमस्कार, न्यू इंडिया अशुरेन्स लि. कंपनी मार्फत विविध पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सदर भरतीविषयी अत्यंत आवश्यक माहिती पुढे देत आहे. सर्व माहिती नीट वाचून पात्र उमेदवारांनी आपला फॉर्म सादर करायचा आहे. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक भरती आहे. प्रशासकीय अधिकारी आणि इतर पदासाठी भरती जारी करण्यात आली आहे. सदर भरतीची सविस्तर माहिती खाली देत आहे. पात्र उमेदवारांनी लागणारे कागदपत्रे, सिलेक्शन पद्धत, वेतनश्रेणी आणि इतर महत्वाची माहिती नीट वाचून आपला अर्ज सादर करायचा आहे.
पदाचे नाव – १) प्रशासकीय अधिकारी (Accounts)
२) प्रशासकीय अधिकारी (Generalists)
NAICL Education Qualification
शैक्षणिक पात्रता –
पद क्र. १
कोणत्यही शाख्रतील पदवी किंवा पदव्युतर पदवी ६०% गुणांसह उतीर्ण
(SC/ST/PWD – 55% गुणांसह उत्तीर्ण)
पद क्र. २
CA/ICA/ICWAI आणि ६०% गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदयुतर पदवी किंवा ६०% गुणांसह MBA Finance/PGDM/ M.Com ( SC/ST/PWD- 55% गुणांसह उत्तीर्ण)
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
वेतनश्रेणी – ५०,९२५/-रुपये ते ९७,७३५/- रुपये
वय मर्यादा – ०१ सप्टेंबर २०२४ रोजी २१ ते ३० वर्ष (SC/ST- ५ वर्ष सूट)
अर्ज फी – खुला वर्ग/ ओबीसी – ८५०रु (SC/ST/PWD – १००रु )
एकूण जागा – १) प्रशासकिय अधिकारी (Accounts) : 50
२) प्रशासकीय अधिकारी (Generalists) : 120
महत्वाच्या तारखा –
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – २९ सप्टेंबर २०२४
परीक्षा दिनांक (phase-1) – १३ ऑक्टोबर २०२४
परीक्षा दिनांक (phase-2) – १७ नोव्हेंबर २०२४
अभ्यार्थी विध्यार्थ्यानी आवश्यक कागदपत्रे, महत्वाच्या दिनांक आणि भरती प्रक्रिया याची व्यवस्थित माहिती वाचून आपला अर्ज दाखल करावा. यामध्ये वेळोवेळी काही बदल होत राहतात त्याबद्दल नेहमी अपडेट असणे आवश्यक आहे. त्यासाठी official website http://newindia.co.in यावरती भेट देणे गरजेचे आहे. भरती प्रक्रियेची सर्व माहिती आणि बदल यात दिले जातील. उपलब्द जाहिरातीनुसार सुरु असलेल्या दोन पदांसाठी १७० जागा काढण्यात आल्या आहेत. या जागा तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत यात वाढ होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या कॅटेगरी नुसार जागा असून त्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
NAICL Recruitment Vacancies –
SC | ST | OBC | EWS | UR | PwBD | TOTAL | |
Accounts | 7 | 4 | 13 | 5 | 21 | 4 | 50 |
Generalists | 18 | 8 | 32 | 12 | 50 | 9 | 120 |
Total | 25 | 12 | 45 | 17 | 71 | 13 | 170 |
याप्रमाणे जागांचा तपशील आहे आपल्या पदानुसार उमेदवाराने आपला अर्ज दाखल करायचा आह. अर्ज भरताना एकदाच आणि एकाच ठिकाणी अर्ज करता येणार आहे. डबल फॉर्म आल्यास आपला फॉर्म रद्द केला जाईल.
NAICL bharti 2024 Selection Process –
Phase 1 – पूर्व परीक्षा
कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना त्यामध्ये अभ्यासक्रम आणि निवड प्रक्रिया याबद्दल निट माहिती असणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षा मध्ये वेगवेगळे टप्पे असतात. हे सर्व टप्पे उमेदवाराला पार करावे लागतात. या भरतीमध्ये उमेद्वाराला पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन प्रकारातून जावे लागणार आहे. पूर्व परीक्षा हि १०० गुणांसाठी असून हि online mcq based पेपर आहे. याचा सविस्तर अभ्यासक्रम आणि गुण खाली दिला आहे.
Subject | Max marks | Version | |
1 | English Language | 30 | English |
2 | Reasoning Ability | 35 | English or Hindi |
3 | Quantitative Aptitude | 35 | English or Hindi |
Total | 100 |
असा अभ्यासक्रम असून यासाठी एका तासाचा वेळ दिला आहे. यात प्रत्येक विभाग उमेदवाराला पास करावा लागेल. उमेदवाराने प्रत्येक section ला योग्य वेळ देऊन पेपर सोडवावा.
Phase 2 – मुख्य परीक्षा
पूर्व परीक्षा पास झाल्यावर उमेदवाराला मुख्य परीक्षेला बसावे लागेल. यात mcq based आणि लेखी पेपर असणार आहे. २०० गुणांसाठी mcq based पपेर असेल व ३० गुणांसाठी लेखी पेपर असणार आहे. त्यासाठी वेळ हा २.५ तासांचा आहे. योग्य पर्यायासाठी २ गुण आहेत. चुकीच्या उत्तरला ०.२५ मार्क कमी केले जाणर आहेत. विद्यार्थ्यांनी योग्य उत्तराची निवड करून पेपर सोडवावं. परीक्षा संदर्भात सर्व नियम कंपनीकडे राहतील. एकदा मिळालेले परीक्षा ठिकाण उमेदवाराला कोणत्याही परीस्थित बदलता येणार नाही.
Phase 3 – मुलाखत
जे उमेदवार पेपर २ clear करतील त्यांना phase 3 साठी निवडले जाईल. उमेदवाराला परीक्षा ठिकाण आणि वेळ परीक्षा पत्रामध्ये दिलेले राहील. उमेदवाराने आपले hall ticket download करून घ्यावे. मिळालेल्या ठीकानामध्ये आणि वेळेत बदल करता येणार नाही. परीक्षा center ला जाताना उमेदवाराने admit card आणि आपला फोटो आणि पत्ता असेल original id card सोबत घेऊन जाने आवश्यक आहे. सोबत एक-दोन फोटो असणे आवश्यक आहे.
परीक्षा ठिकाण रराज्यानुसार त्या त्या राज्यातील जिल्ह्याच्या किंवा मुख्य शहराच्या ठिकाणी राहणार आहे.
How to apply NIACL Recruitment –
सर्वप्रथम उमेदवाराने आपले registration करून घ्यावे. फॉर्म भरताना योग्य माहिती भरावी.एकदा फॉर्म submit केल्यावर त्यात पुन्हा बदल करता येणार नाही. आपला फोटो ३ महिन्याच्या आतील द्यावा जुना फोटो अपलोड करू नये, फोटो ब्लर आल्यास आपला फॉर्म बाद केला जाऊ शेकतो. सही काळ्या पेन वापरून करावी. सही आणि डाव्या हाताचे ठसे सुद्धा द्यावे लागणार आहे. उमेदवाराला एक स्वयं घोषणापत्र द्यावे लागणार आहे. सादर घोशानापत्रक त्याने स्वतः लिहिले असावे. फॉर्म बरून उमेदवाराने आपली परीक्षा शुल्क भरावी. शुल्क भरून त्याची पावती जवळ ठेवावी. सर्व फॉर्म भरून आपली माहिती बरोबर आहे कि नाही याची खात्री करावी, त्यानंतरच फॉर्म सबमिट करावा. एकदा फॉर्म सबमिट केल्यावर परत त्यात बदल करता येणार नाही. भरलेल्या फॉर्म ची प्रिंट काढून जवळ ठेवावी.
जाहिरात बघण्यासाठी – येथे पहा
Online अर्ज करण्यासाठी – येथे पहा
Official website – येथे पहा
PDF जाहिरात – येथे पाहा