Join Whatsapp Group

Join Telegram Group

शेतकरी आहात ? जाणून घ्या शासनाच्या या योजना Government schemes for farmers 2024

Government schemes for farmers – विधानसभा निवडणूक ज्याप्रमाणे जवळ येत असताना भारत सरकारच्या पूर्वीपासून चालू असलेल्या सर्व योजनांच्या कामकाजाला आता वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. यात तुम्ही शेतकरी आहेत तर शासनाच्या या संधीचा फायदा का सोडता ? केंद्र आणि राज्य सरकारने आपल्यासाठी विविध योजना काढल्या आहेत. याचा फायदा आपण नक्कीच घेतला पाहिजे. याच योजनांमधील प्रमुख चालू असलेल्या योजनांची माहिती या लेखात पाहणार आहोत. 

Top 5 Gov. Scheme for farmers in Maharashtra

1) PM पिक विमा योजना – 

सरकारने सुरु केलेल्या पी एम पिक विमा योजना हि आपल्या शेतीची होणारी नुकसान यावर भरपाई म्हणून सरकार अनुदान काही रक्कम शेतकरी वर्गाला देत असते. यामध्ये नैसर्गिक आपत्ती , रोगराई कीड यामुळे आपल्या शेतीचे खूप नुकसान होत असते. हे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांसाठी सदर योजना निर्माण केली आहे. या योजनेचे मुळ नाव “फसल बिमा योजना” phasal bima yojana असे आहे. यामध्ये जर शेतकर्याने आपल्या पिकासाठी विमा काडला असेल तर शासन त्या शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकर्याला आर्थिक सहाय्य करत असते. यात राज्य सरकार आणि केंद्र सरकार ५०-५० टक्क्ये प्रमाणात सबसिडी देत असते. 

2) PM KISAN सन्मान निधी योजना – 

सर्व शेतकरी वर्गाला मिळणारी योजना म्हणजे पी एम सन्मान निधी योजना. या योजनेने सर्व पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी रु ६००० इतके आर्थिक सहाय्य शासन देत असते. याचे लाभार्थ्याला ३ महिनेचे २००० रु याप्रमाणे वितरण केल जाते. शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यात रक्कम जमा होत असते. या योजनेचे १४ पेक्ष्या अधिक हप्त्याचे वितरण झाल्याचे बघायला मिळते. 

3)PM KISAN मानधन योजना – 

या योजनेत शेतकरी वर्गाला जवळपास तीन हजार इतक मानधन मिळत असते. यासाठी सरकारचे काही निकस आहेत याची पूर्तता करून शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेसाठी अर्जदाराचे वय १८ ते ४० यादरम्यान असले पाहिजे आणि अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे. ज्यावेळी शेतकरी वयस्कर होत असतो त्यावेळी या योजनेचा लाभ मिळत असतो. वय ६० वर्ष पूर्ण झाल्यावर शासन त्यांना ३००० रु मानधन देत असते. यात शेतकर्याची जमीन दोन हेक्टर पेक्षा कमी असणे आवश्यक आहे हि या योजनेची प्रमुख अट आहे. यासाठी शासनाच्या अधिकृत site ला भेट देऊन आपला अर्ज करू शकता किंवा जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात अर्ज करू शकता . 

3) नमो शेतकरी सन्मान योजना  

केंद्र सरकारने चालू केलेल्या पी एम किसान सन्मान योजनेचाच एक भाग म्हणून राज्य सरकारने चालू केलेली योजना म्हणजे नमो शेतकरी सन्मान योजना namoshetkari yojana . यात केंद्र सरकार ज्याप्रमाणे ६००० रु वार्षिक रक्कम शेतकऱ्याला देते त्याचप्रमणे राज्य सरकार सुद्धा देत आहे. २००० रु तिमाही स्वरुपात लाभार्थी शेतकरी वर्गाला मिळत असते. 

4) किसान क्रेडीट कार्ड योजना – 

या योजनेमध्ये केंद्र सरकार शेतकरी वर्गाला ४%दराने कर्ज देत असते. केंद्र सरकारने या योजनेचा प्रारंभ १९९८ पासून सुरु केला असून या योजनेचे नाव kisan credit card yojana असे आहे . आत्तापर्यंत अडीच कोटीहून अधिक शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. शेतकरी वर्गाला कर्ज रूपाने कमी टक्के या दराणे कर्ज उपलब्ध करून देणे हा उद्देश या योजनेचा आहे. अश्याच प्रकारच्या विविध योजना सरकार नेहमी काढत असते. या योजनेचा लाभ नक्कीच घेतला पाहिजे. 

5) लाडकी बहिण योजना ladalibahin yojana 

यासर्व योजना तसेच महाराष्ट्र सरकारने आत्ताच काही महिन्यापूर्वी चालू केलेली योजना म्हणजे माझी लाडकी बहिण योजना. हि योजना महिला सशक्तीकरण आणि महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली आहे. या योजनेंतर्गत महिलांना दरमह १५०० रु याप्रमाणे आर्थिक सहाय्य दिले जात आहे. लाभार्थी निवडीसाठी निकस लावले आहे या निकषाच्या आधारावर लाभार्थी निवड करून त्याच्या आधार लिंक बँक खात्यात रक्कम जमा होत आहे. आतपर्यंत खूप महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेचा पहिला आणि दुसर्या हप्त्याचे वितारण झाले असून आता तिसर्या हप्त्याची वाट महिला वर्ग पाहत आहे. शासनाकडून लवकरच तिसर्या हप्त्याचे वितरण केल जाणार आहे. अजूनही काही लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. कागदपत्रांची अपूर्णता आणि बँक खाते नसणे किंवा ते खाते आधार लिंक नाही अश्या अडचणी येत आहेत. मुदत संपण्याचा आत आपला अर्ज भरून सदर योजनेचा लाभ घ्यावा. 

6) Magel Tyala Solar Pump Yojana 2024 :

अंतरिम अर्थसंकल्पात शेतकरी अधिक प्राधान्य देण्यात आलेले आहे .शेतकऱ्यांसाठी मागील त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना राबविण्यात येत असून 8 लाख 50 हजार नवीन सौर पंप देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. याशिवाय सर्व उपस्थित सिंचन योजनांचे दोन वर्षात वर्गीकरण केले जाणार आहे .सौरऊर्जा शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री मागेल त्याला सौरकृषी पंप योजना योजनेअंतर्गत 7000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांची शेतजमिनीवर सौर पंप बसवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार असून त्याद्वारे शेतकऱ्यांना परिसरातील उपलब्ध मुबलक सौरऊर्जेचा वापर त्यांच्या कामासाठी करता येईल. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी सौर पंप योजना आर्थिक प्रोत्साहन म्हणून किफायतशीर सिद्ध करण्यासाठी सबसिडी देखील दिली जाईल.

Reed More

Leave a Comment