Join Whatsapp Group

Join Telegram Group

Vidhansabha Election Maharastra 2024,विधानसभा निवडणूक ,मोठी बातमी! शरद पवार यांनी जाहीर केली पहिली यादी; अजितदादा विरुद्ध ‘हा’ उमेदवार उभा…

विधानसभा निवडणूक २०२४ : Vidhansabha Election maharastra 2024

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक(Vidhansabha Election Maharastra) वारे सर्वत्र जोराने वाढत असून यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी आपापल्या पक्षाकडून उमेदवार घोषित करत आहेत. यातच महाविकास आघाडी गटातील ठाकरे गटाच्या शिवसेना (Shivsena UBT) यांनी आपल्या ६५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आता यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी (Sharad Pawar NCP) यांनी आपल्या ४५ उमेदवार यादी जाहीर केली असून त्यांची हि पहिली यादी आहे. पक्ष प्रदेक्षाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपल्या या गटाची पहिली यादी जाहीर केली आहे.

शरद पवार यांची पहिली यादी:Sharad Pawar NCP

जयंत पाटील यांनी जाहीर केलेल्या पहिल्या यादीनुसार इस्लामपूर या ठिकाणातून जयंत पाटील स्वतः तर घनसंघवी येथून राजेश टोपे, काटोल- अनिल देशमुख, मुब्रा कालवा- जितेंद्र आव्हाड, कराड उत्तर येथून बाळासाहेब पाटील, वसमत- जयप्रकाश दांडेगावकर, कोरेगाव या ठिकाणातून शशिकांत शिंदे, जळगाव ग्रामीण- गुलाबराव देवकर, राहुरी या ठीकानाहून प्राजक्ता तनपुरे, इंदापूर- हर्षवर्धन पाटील शिरूर या विभागातून अशोकराव पवार तर विक्रमगड – सुनील भुसार आणि कर्जत जामखेड मधून रोहित पवार हे आहेत. शिरला- मानसिंगराव नाईक,बारामती – युगेंद्र पवार, अहमदपूर या ठिकाणातून विनायकराव पाटील, कागल- समर्जीत घाटगे, शिंदखेड राजा – राजेंद्र शिंगणे, भोकरदन – चंद्रकांत दानवे, उदगीर – सुधाकर भालेराव, तुमसर- चरण वाघमारे, भोकरदन- चंद्रकांत दानवे हे उमेदवारी करणार आहेत. किनवट- प्रदीप नाईक हे आपली दावेदारी दाखल करणार आहेत.

पारनेर मतदार संघातून “राणी लंके” यांना संधी

केज या ठिकाणातून पृथ्वीराज साठे, जिंतूर- विजय भाम्बले, वडगाव शेरी – बापुसाहेब पठारे, बेलापूर – संदीप नाईक, जामनेर – दिलीप खोडपे, अहेरी- भाग्यश्री अत्राम, मुर्तीजापूर- सम्राट डोंगर दिवे हे आपली दावेदारी करतील. मुरबाड- सुभाष पवार, आंबे गाव – देवदत्त निकम, घाटकोपर पूर्व- राखी जाधव, कोपरगाव- संदीप वर्ष , बदनापूर- बबलू चौधरी, शेवगाव-पाथर्डी या ठीकानाहून प्रताप ढाकणे आणि पारनेर येथून राणी लंके हे आपली लढत लढणार आहेत. अस्थी- मेहबूब शेख, सोलापूर शहर उत्तर- महेश कोठे, करमाळा- नारायण पाटील, चिपळूण- प्रशांत यादव, तासगाव-कवठे महाकाळ या ठिकाणातून रोहित आर आर पाटील यांना उमेदवारी करण्याची संधी देण्यात आली आहे. याप्रकारे जयंत पाटील यांनी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. आपली दुसरी यादी लवकरच जाहीर करणार आहोत असे जयंत पाटील यांनी माहिती दिली आहे.

“पवार साहेबांचा मला आशीर्वाद” झिरवाळ यांचे मोठे विधान; Nashik Political news

राज्यातील विधानसभा निवडणुका येत्या २० नोवेंबर रोजी मतदान होणार असून २३ तारखेला याचा निकाल लागणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात २२ ऑक्टोंबर पासून सुरुवात झाली आहे. यात दिंडोरी-पेठ मतदार संघात अजित पवार गटाचे उमेदवार नरहरी झिरवाळ हे उमेदवारी करणार आहेत. मात्र अर्ज भरण्यापूर्वी झिरवाळ यांनी एक मोठे विधान केल आहे. शरद पवार यांच्या विषयी हे विधान केल आहे, त्यामुळे सर्वंच्या भुवया उंचावल्या आहेत, एक आश्चर्य झाल्यासारखे वाटत आहे.

नाहारी झिरवाळ विधानसभा उपाध्यक्ष म्हणले कि राष्ट्रवादी गटात दोन भाग असले तरी शरद पवार यांचा मला लांबून आशीर्वाद असणार आहे. धनराज महाले यांनी आपला अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांना मी विनंती करणार आहे आणि ते आपला अर्ज मागे घेतील असा मला विश्वास आहे, असे नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे. त्याच बरोबर दिंडोरी मतदार संघात विकासाच्या जोरावर आणि केलेल्या कामकाजावर मला निवडून देतील. या मतदार संघात मी निवडून येईल याची मला खात्री आहे, असेही झिरवाळ यांनी सांगितले.

तर दुसरीकडे शरद पवार यांच्या वाट्याला या मतदार संघातील जागा येणार आहे, यात ते कोणाला आपला उमेदवार जाहीर करतील यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. धनराज महाले हे देखील शरद पवार यांच्या गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत असे बोलले जात आहे.

Leave a Comment