Vanrakshak Bharti 2025- नमस्कार सरकारी, निमसरकारी नोकरी माहिती केंद्र jobcy.in या नोकरी भरती केंद्रात स्वागत… वनविभाग क्षेत्रात सुमारे १२९०० पदे रिक्त असून याची भरती लवकरच केली जाणार आहे. वेगवेगळ्या पदांसाठी सदर भरती काढण्यात येणार असून हि मेगा भरती होणार आहे. यात वनरक्षक, वनमजूर, आणि नवीन वन सेवक या पदांचा समवेश करण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या अभ्यार्थी विद्यार्थ्यांनी आपली तयारी सुरु ठेवायची आहे. कारण सुमारे १२९०० पदांसाठी मेगा भरती केली जाणार आहे, या वर्ष्याच्या अखेर अधिकृत जाहिरात येण्याची श्यक्यता आहे. या वनरक्षक भरती विषयी सविस्तर माहिती खालील लेखात दिली आहे, माहिती पूर्ण वाचून जाहिरात आल्यावर अर्ज कसा करायचा आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत याची माहिती देण्यात आली आहे.
Vanrakshak Bharti 2025 job Vaconcy details
मार्च २०२४ पर्यंत वनरक्षक पदांची संख्या माहिती नुसार वनरक्षक पदांच्या ९७८५ पदे मंजूर असून यातील ८१०१ पदे भरण्यात आली आहेत. म्हणजे १६८४ इतकी पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांसाठी जाहिरात येण्याची श्यक्यता आहे. वनविभागाचे वाढते महत्व आणि वनविभागाच्या विविध कामासाठी वनसेवकांचे महत्व देखील वाढले आहे. महाराष्ट्र फॉरेस्ट प्रमाण पाहता वनसेवकांची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
vanrakshak bharati Exam Pattern 2025
वनरक्षक परीक्षा हि पूर्णतः सरळसेवा माध्यमातून होणार आहे, ज्यात डायरेक्ट सेलेक्षण व्यवस्था असते. उमेदवारांनी स्थानिक क्षेत्रातच आपला अर्ज भरावा कारण स्थानिक रहिवाशी प्रमाणपत्र आवश्यक आहे. स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी ठराविक तरतुदी करण्यात आल्या आहेत. वनविभागात भरती होण्यासाठी स्थानिक विभागातील असावा.
Vanrakshak Bharti Salary
उमेदवाराला गट ड मधील पदांतर्गत सातव्या वेतन आयोगानुसार १५००० रुपये ते ४७६०० रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे. पदानुसार सुरुवातीला अपेक्षित वेतन २८००० ते ३०००० रुपये दरम्यान मिळणार आहे . त्यामुळे स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे. आपली तयारी योग्य रित्या चालू ठेऊन या परीक्षेत यश मिळवायचे आहे. परीक्षेमध्ये होत असलेल्या बदलामुळे आता अभ्यार्थी विद्यार्थ्याला चांगली संन्धी निर्माण होणार आहे कारण २०२६ पासून सर्व प्रकारच्या भरती प्रक्रिया एमपीएससी घेणार असून यात मोठ्या प्रमाणात पदे भरली जाणार आहेत. परीक्षा संदर्भात पारदर्शकता आणण्यासाठी भरती प्रक्रिया एमपीएससी कडे दिली जाणार आहे.
Vanrakshak Bharti Age Limit
वनरक्षक पदासाठी काही वयमर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत, त्या १८ ते ३८ वर्ष वय असलेल्या उमेदवाराला अर्ज करता येणार आहे. मागास आणि इतर वर्गासाठी ०५ वर्ष सवलत दिली जाणार आहे.
1 thought on “Vanrakshak Bharti 2025, Forest Gard Bharti; वनविभागात येणार मेगा भरती, वनरक्षक पदांच्या १२९०० पदांची मेगा भरती”