Union Bank of India Recruitment 2024 :
युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India Recruitment 2024) मध्ये विविध जागांसाठी भरती ने 1500 जागांसाठी भरतीची घोषणा केली आहे. सरकारी बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न असलेल्या तरुणांसाठी हि एक आनंदाची बातमी आहे या संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या पात्रतेनुसार online अर्जकरायचा आहे. चला तर मग, या भरतीबद्दल सविस्तर माहिती पाहूया.
एकूण जागा : 1500
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये स्थानिक बँक अधिकारी (LBO) या पदावर भरती केली जाणार असून ही एक सुवर्ण संधी आहे, विशेष म्हणजे जे बँकिंग क्षेत्रात करियर बनवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी.
पदाचे नाव: स्थानिक बँक अधिकारी (LBO)
स्थानिक बँक अधिकारी म्हणून काम करण्यासाठी, उमेदवारांना आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान असणे आवश्यक आहे. यामध्ये ग्राहक सेवा, वित्तीय साक्षरता आणि बँकेच्या प्रक्रियांची चांगली माहिती असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी, कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे. त्यामुळे Arts, Science, Commerce किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील पदवीधारक या पदासाठी अर्ज करू शकतो.
वयाची अट
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. यामध्ये अनुसूचित जाती SC/ST साठी 5 वर्षे आणि OBC साठी 3 वर्षांची सूट असणार आहे.
नोकरी ठिकाण
युनियन बँक ऑफ इंडिया च्या नोकरीच्या 1500 जागा संपूर्ण भारतभर उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही भारतातील कोणत्याही ठिकाणी काम करण्यास तयार असाल, तर ही संधी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
अर्जाची फी
उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शुल्क भरावे लागेल. सामान्य व OBC उमेदवारांसाठी अर्जाची फी ₹850/- आहे, तर SC/ST आणि PWD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹175/- आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया
उमेदवारांनी खालील लिंकवर जाऊन अर्ज करावा लागेल:
[अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा]
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 नोव्हेंबर 2024 आहे. त्यामुळे तुम्हाला यापूर्वीच अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
सविस्तर जाहिरात
या भरतीसाठी सविस्तर माहिती मिळवण्यासाठी तुम्ही खालील PDF जाहिरात पाहू शकता:
[सविस्तर जाहिरात PDF येथे उपलब्ध आहे]
Official Site : www.unionbankofindia.co.in
भरती प्रक्रिया
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये निवड प्रक्रिया दोन्ही टप्प्यात असेल. पहिला टप्पा म्हणजे ऑनलाइन परीक्षा, ज्यामध्ये सामान्य बुद्धिमत्ता, इंग्रजी, संख्यात्मक क्षमता आणि वित्तीय ज्ञान यावर आधारित प्रश्न असतील. यानंतर, पात्र उमेदवारांचा इंटरव्ह्यू घेतला जाईल. त्यामुळे तयारी करण्यास तुम्ही सुरुवात करू शकता !