Join Whatsapp Group

Join Telegram Group

टीम इडिया बांग्लादेश संघावर भारी, परंतु भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्यावर झाला लाजीरवाणा विक्रम…

टीम इडिया बांग्लादेश संघावर भारी, परंतु भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्यावर झाला लाजीरवाणा विक्रम
भारत विरुद्ध बांगलादेश संघात सुरु असलेल्या 1st कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस खेळला गेला. चेन्नई मध्ये चालू असलेला दुसर्या दिवसाचा खेळ भारतीय संघाच्या नावावर राहिला. भारतीय fast बॉलर यांनी अप्रतिम कामगिरी केली. पाहुण्या संघाचा डाव अवघ्या ४७ षटकात आवरला होता. पण भारत फलंदाजी करायला आल्यावर त्यांची सुद्धा खूप लवकर विकेट गमावल्या. दिवसाअखेर ३ बळी गमावले. यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याच्या विकेटचा देखील समावेश होता. बांगलादेश विरुध्द चालू असलेल्या पहिल्या सामन्यात दोन्ही डावात रोहित शर्मा चालू शकला नाही. त्यामुळे रोहित शर्माच्या नावावर एक लाजीरवाणा विक्रम झाला आहे.
१६ वर्षांनी असा प्रकार घडला
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यासाठी चालू असलेल्या पहिल्या कसोटी सामना काही खास चांगला ठरताना दिसत नाही. या सामन्यात पाहिया डावात रोहित शर्मा ला जास्त वेळ फलंदाजी करता आली नाही. त्याने १९ चेंडू मध्ये केवळ ६ धावा करून बाद झाला. त्याचवेळी त्याने दुसर्या डावात सुद्धा फार चांगली कामगिरी केली नाही. त्यात ७ चेंडूत ५ धावा करून बाद झाला. म्हणजे या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याला एकही डावात दुहेरी आकडा गाठता आला नाही. मायदेशात कसोटी सामन्यात दोन्ही डावामध्ये एकेरी धावसंख्येवर बाद होणारा रोहित शर्मा हा जवजवळ १६ वर्ष्यानी पहिला भारतीय कर्णधार ठरला. त्याचबरोबर रोहित २०१५ नंतर पहिल्यांदा घरच्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात एकेरी धावसंख्येवर बाद झाला. संपूर्ण कसोटी क्रिकेट मधील मात्र हि त्याच्या कारकिर्दीतील केवळ चौथी वेळ आहे. या अगोदर २०२३ साली दक्षिण आफ्रिका सोबत झालेल्या कसोटी सामन्यात तो दोन्ही डावात एकेरी धावसंखेवर बाद झाला होता. यादरम्यान भारतीय संघाने पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करत ३७६ धावा केल्या. यात रवींद्र जडेजा आणि रवी अश्विन यांच्या चांगल्या खेळीने भारतीय संघाला मजबूत केल. शतकवीर रवी आश्विन यांनी आपल्या फलंदाजीची चांगली चमक दाखवली. याचा प्रतिउत्तर बांगलादेश संघाचा पहिला डाव १४९ धावावर आटोपला. भारतीय संघाचे स्टार fast गोलंदाज यांनी खूप सुंदर कामगिरी केली. यात जसप्रीत बुमारा याने ४ बळी घेतले तर मोहम्दाद सिराज, आकाश दीप, रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ बळी घेऊन १४९ धावावर पहिला डाव संपवला. यानंतर आलेल्या भारतीय संघ दुसर्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ बाद ८१ धावा करून थांबला. यात रोहित शर्मा सोबत विराट कोहली याला देखील खास चांगली कामगिरी करता आली नाही. शुभमन गिल मात्र अजून नाबाद संयमी खेळी खेळताना दिसत आहे. त्याला रिषभ पंत साथ देत नाबाद आहे. दुसर्या दिवसाचा खेळ पूर्ण होत भारतीय संघाने ३०८ रनांची आघाडी घेतली आहे. आता उद्या चालू होणार्या तिसर्या दिवसाच्या खेलीवर सर्व match अवलंबून आहे. उद्याच्या खेलीवर सामना ठरेल कि कोणाचा पगडा जड आहे.

Leave a Comment