Railway Bharati ITI Recruitment
पूर्वोत्तर फ़्रन्तिअर रेल्वे विभागात अप्रेन्तीस या पदाकरिता सुमारे ५६४७ जागांसाठी मेगा भरती काढली असून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षा तयार करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी हि चांगली संधी उपलब्ध झाली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज भरायचे आहेत. अर्ज करण्याच्या तारखेच्या आत अर्ज भरून घ्यायचा आहे. शेवटी शेवटी अर्ज करण्यासाठी वेबसाईट चालत नाही आणि अर्ज भरण्यापासून तुम्ही राहू शकता. आजच अर्ज भरायचा आहे, अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करायचा आहे याची सविस्तर माहिती खालील लेखात दिली आहे. माहिती निट वाचून मगच अर्ज भरायचा आहे.
Railway Bharati ITI Recruitment Post Details; रेल्वे भरती सविस्तर माहिती
पदाचे नाव- अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी)
एकूण जागा- ५६४७
नोकरी ठिकाण- पूर्वोत्तर प्रन्तिअर रेल्वे विभाग
वयाची अट- ०३ डिसेंबर २०२४ रोजी १५ ते २४ वर्ष यात SC/ST: ०५ वर्ष सूट, OBC: ०३ वर्ष सूट
अर्ज करण्याची फी- खुला वर्ग आणि ओबीसी : १०० रुपये , SC/ST/PWD/EBC/ महिला – यांना फी सवलत देण्यात आली आहे.
अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक- ०३ डिसेंबर २०२४
RAILWAY VACANCY BHARATI EDUCATION QUALIFICATION; शैक्षणिक पात्रता
पूर्वोत्तर विभागातील रेल्वे भरतीच्या या ५६४७ पद्नाच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खूप कमी आहे, तुमच्या घरात जर १० वी पास आणि आय टी आय (ITI Bharati) कोर्स केला असेल तर हि भरती त्याला नक्की पाठवा. आय टी आय केलेल्या प्रत्येक विभागातील या जागा भरण्यात येणार असून जागांची संख्या खूप आहे. आपल्या फिल्ड नुसार जागा वाटप होणार आहे. खालील तक्त्यात सर्व तपशील देण्यात आला आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अप्रेंटीस (प्रशिक्षनार्थी) | किमान ५०% गुणांसह १०वी पास असावा. |
ITI कोर्स केलेला असावा. (Mechanist, Mechanic, Welder, Fitter, Carpenter, Diesel Mechanic, Painter, Electrician, Lineman, Mason, Fitter Structural, Grinder Mechanist, Information And Communication Technology in Information Technology) |
Railway Bharati Last Date, Schedule; अर्ज करण्याची शेवटची दिनांक
भारतीय रेल्वे विभागातील या मेगा भरती साठी पदभरती शेडूल विभागाने आपल्या अधिकृत जाहिरातीमध्ये दिले आहे. या जाहीर केलेल्या तारखेप्रमाणे भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येणार नाही. उमेदवारांनी अर्ज लवकरात लवकर भरायचा आहे. माहिती तपशील खाली दिला आहे.
तपशील | दिनांक |
भरती विभाग | नॉर्थ इस्ट फ्रंटइअर रेल्वे विभाग |
अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर उपलब्ध | ०४ नोव्हेंबर २०२४ |
अर्ज करण्यासाठी सुरुवात | ०४ नोव्हेंबर २०२४ |
अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक | ०३ डिसेंबर २०२४ |
How To Apply Railway Bharati; अर्ज कसा करायचा?
रेल्वे विभागाच्या या भारती करिता ऑनलाइन अर्ज करायचा आहे. दिनांक ०४ नोव्हेंबर पासून याची सुरुवात झाली आहे.
- अर्ज करण्यासाठी सर्वात आधी रेल्वे विभागाच्या RRC/NFRs Website- www.nfr.indianrailways.gov.in या ठिकाणी जायचे आहे.
- यामध्ये General info option निवडून Railway Recruitment Cell GHY हा पर्याय निवडायचा आहे.
- आपले Registration करायचे आहे. आपली माहिती भरून झाल्यावर तुम्हला एक user id आणि password तयार करून आपले Registration पूर्ण करायचे आहे.
- Registration झाल्यावर log in करून आपला अर्ज भरायचा आहे.
- माहिती भरताना अचूक आणि निट भरायची आहे.
- मुळ कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- सर्व माहिती भरून झाल्यावर सबमिट करून आपल्या अर्जाची प्रिंट काढून ती सोबत ठेवायाची आहे.
- Document Verification च्या वेळी सर्व कागदपत्र लागणार आहेत.
Railway Recruitment Selection Process; निवड प्रक्रिया
रेल्वे विभागाच्या या भरती करिता अर्ज भरलेल्या सर्व उमेदवारांचे तुम्हाला मिळालेल्या १०वी , १२वी आणि आय टी आय (ITI) कोर्स केलेल्या मार्क्स च्या आधारावर तुमची निवड केली जाणार आहे. या गुणांच्या आधारे निवड करून फायनल यादी लावली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे तपासणी साठी बोलावले जाणार आहे. कागदपत्रे तपासून नंतर तुमचे सिलेक्शन होणार आहे. कागपत्रे तपासणी च्या वेळी जवळ मेडिकल तपासणी सर्तीफिकेत आवशक आहे.
सविस्तर जाहिरात pdf – Click Here
अर्ज करण्यासठी – Click Here
चालू नोकरी जाहिरात – Click Here