farmer news 2024 नाशिक शेतकरी: सोयाबीन शेतकरी घाबरलेले असून द्राक्ष झाडाच्या छाटण्या सुद्धा थांबल्याचे चित्र नाशिक आणि निफाड या भागामध्ये निरीक्षणास येत आहे.
नाशिक/निफाड:
या दोन भागामध्ये मागील दोन दिवसापासून पूर्व भागामध्ये तसेच पश्चिम भागामध्ये सुद्धा पाऊस होत असल्याने शेतकरी काढणीस आलेले सोयाबीन हातातून जाते कि काय या धास्तीने घाबरलेले आहेत. तसेच द्राक्ष्याच्या छाटण्या देखील थांबल्याचे चित्र या भागामध्ये दिसून येत आहे. आताच सुरु झालेल्या द्राक्षाच्या छाटण्या आता पाऊसामुळे थांबल्या आहेत. शिवरे ,विंचूर ,शिवडी, लासलगाव ,धारणगाव ,निफाड ,श्रीरामनगर ,आंबेवाडी गावासह या परीसारतील गावांमध्ये आज दुपारी चार साडे चारच्या दरम्यान मुसळधार पाऊस वरसला आहे. हा पाऊस हाताशी आलेले सोयाबीनसाठी नुकसानकारक ठरू शकणार आहे.
विंचूर ,शिवरे ,श्रीरामनगर तसेच निफाड च्या आजूबाजूच्या भागांमध्ये सोयाबीन काढणीचा हंगाम चालू होत असल्यामुळे या अशा ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. पंधरा सोळा दिवसाच्या विश्रांतीनंतर शनिवारी (ता .२१ ) रोजी पुन्हा पाऊस कोसळला आहे. निफाडच्या परिसरातील द्राक्ष पंढरीमध्ये सध्या गोड्या बाराच्या छाटनिची लगबग सुरु होण्याच्या मार्गावर असतानाच या पाऊसाच्या वातावरणामुळे द्राक्षाच्या छाटण्यादेखिल थांबल्या आहेत.(farmer news )
कसबे – सुकेणे :
गेल्या आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने आज कसबे – सुकेणे व या परिसरातील आजूबाजूच्या भागामध्ये पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन – मक्का तसेच अन्य पिकांना या पाऊसामुळे दिलासा मिळणार आहे. पावसाच्या कमतरतेमुळे या भागातील सोयाबीनसह,भाजीपाला, मक्का पिके हातातून जाणार कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती काही दिवसांपूर्वी. ज्यांच्याकडे विहीर , शेततळे अशी पाण्याची सोय होती त्यांनी सोयाबीनसह इतर पिकांना पाणी देण्यास सुरुवात केली होती. मात्र सर्व शेतकऱ्यांजवळ विहीर , शेततळे नसल्यामुळे त्यांना पाणी देणे शक्य नव्हते.पिकाला पाणी देणे सर्व शेतकऱ्यांना हे शक्य नसल्याने हाताशी आलेले सोयाबीन हातचे जाते कि काय अशी शेतकऱ्यांवर परिस्थिती निर्माण झाली होती. आजच्या झालेल्या पाऊसामुळे या भागातील पिके वाचणार आहेत. कसबे – सुकेणे या परिसरातील भागाला पावसाने सलामी दिली ,त्यामुळे या भागातील बळीराजा काही प्रमाणात सुखावला आहे. उशिरा का होईना पण पावसाने या भागामध्ये पावसाचे आगमन झाल्याने तूर्त काळासाठी या पिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तसेच या परिसरातील शेतकर्यांच्या चेहऱ्यावर आता कुठे थोडे स्मितहास्य निर्माण होत आहे.