Join Whatsapp Group

Join Telegram Group

LADAKI BAHIN YOJANA 2024 लाडकी बहिण याजना तिसरा हप्ता कधी जमा होणार ?तारीख झाली जाहीर..


Ladli behana 3ed installment date 2024

Ladaki bahin yojanaमहाराष्ट्र सरकारने महिलांसाठी चालू केलेली योजना “माझी लाडकी बहिण” या योजनेच्या लाभार्थी महिला वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेच्या पुढील हप्त्याचे वितरण लवकरच केले जाणार आहे. असे महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. या लेखामध्ये आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती आणि आता येणाऱ्या तीसऱ्या हप्त्याची तारिख नेमकी कोणत्या दिवशी पैसे जमा होणार आहेत याची माहिती दिली आहे.

Ladaki bahin yojana  start योजनेची सुरुवात-

“माझी लाडकी बहिण यीजना” हि महाराष्ट्र शासनाने चालू केलेली एक महत्वाची योजना आहे. यात राज्यातील महिलांच्या आर्थिक सबलीकरण आणि महिला वर्गाला मदत म्हणून लाभ दिला जात आहे. या योजनेचा १ कोटी पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतला आहे. सदर योजना खूप लोकप्रिय झाली आहे.

योजनेचे महत्व-

माझी लाडकी बहिण योजना हि महाराष्ट्रतील महिलांच्या आर्थिक स्थिती मध्ये सुधारणा घडून आणण्यासाठी सरकारचे एक महत्वपूर्ण पावूल आहे. यात महिला वर्गाचे आर्थिक सबलीकरण, सामाजिक सुरक्षा, लिंग समानता, गरीब निर्मुलन आणि शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात विकासाच्या संधी उपलब्ध होतांना दिसत आहे. महिलांच्या खात्यात थेट आर्थिक मदत त्यांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यास मदत करणार आहे. गरजू महिलांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणार आहे. गरीब कुटुंबाना आर्थिक मदत मिळून गरिबी कमी होण्यास मदत होईल. तसेच या निधीचा वापर महिनाच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी केला जाऊ शेकतो. जो तो आपल्या गरजेनुसार सदर योजनेतील निधीचा वापर करून आर्थिक बाबतीत सक्षम आणि बचती मध्ये सुद्धा याचा वापर केला जाऊ शेकतो.

योजनेतील आव्हाने आणी अडचणी-

महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी काही आव्हाने व अडचणी येत आहेत.

  • तांत्रिक अडचण- लाभार्थी महिला बँक खाते आधार लिंक आणि डीबीटी mapping नसणे हि सर्वात मोठी अडचण आहे.
  • जागरूक नसणे – अजूनही काही भागात या योजनेच्या लाभापासून काही महिला वंचित राहिल्या आहेत. यामध्ये अपूर्ण कागदपत्रे, बँक खाते नसणे, खाते आहे पण आधार लिंक नाही अश्या बर्याच कारणाने काही महिला वर्गांचे फॉर्म पेंडिंग आहेत किंवा अजून भरून झाले नाहीत.
  • होणारा गैरवापर- या योजनेतून जर कोठे गैरवापर होत असेल तर त्यावर योग्य नियंत्रण असणे आवश्यक आहे.
  • बँक पायाभूत सुविधा नसणे- ग्रामीण भागात बँकिंग सुविधा उपलब्द नसणे.
महाराष्ट्र सरकारचे धोरण –

माझी लाडकी बहिण योजना हि महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे. आता येणाऱ्या तिसरया हप्त्याने हि योजना खूप अधिक महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येणार याची अपेक्षा आहे. हि योजना यशस्वी करण्यासाठी सरकार बँक आणि लाभार्थी यांच्यात योग्य समन्वय महत्वाचा ठरणार आहे. सर्व महिला वर्गाने या योजनेच्या लाभासाठी योग्य ती खबरदारी घेऊन आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी या संधीचा पुरेपूर लाभ घेतला पाहिजे.सरकार सुद्धा या योजनेच्या अंमलबजावणीसाठी येणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करण्यासाठी सतत प्रयत्नशील असताना दिसत आहे.

योजनेची आतापर्यंतची परिस्थिती-

सदर योजनेच्या अंमलबजावणी पासून आतापर्यंत खूप मोठी प्रगती केली आहे.

  1. पहिला व दुसरा हप्ता- या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.
  2. आलेला प्रतिसाद – या योजनेसाठी १ कोटीपेक्षा अधिक महिलांनी अर्ज सादर केले आहेत.
  3. तिसर्या हप्त्याची घोषणा- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी तिसर्या हप्त्याची घोषणा केली आहे. 
तिसर्या हप्त्याची तारीख- Ladaki bahin 3ed installment date

या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची माहिती अशी आहे कि १९ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता वितरण होणार आहे. ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक आहे त्यांना हा हप्ता येणार आहे.

Chandan Kanya Yojana 2024

Leave a Comment