Ind vs ban : भारत-बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या टेस्ट मालिका याचा पहिला कसोटी सामना भारतने आपल्या नावावर केला आहे. आता चालू असलेल्या दुसर्या सामना चांगलाच रंगात आला आहे. या सामन्यात पाहुणा संघ बांगलादेश यांनी प्रथम फलंदाजी करत २३३ धावा काढून पहिला डाव संपला. यात दोन दिवस पावसामुळे कोणताच खेळ झाला नाही. आज चौथ्या दिवशी खेळ नव्याने सुरु होत. या दिवशी भारतीय संघाने आक्रमक खेळी करत हा दिवस आपल्या नावावर करण्याच्या खेळीने खेळ चालू आहे. यामध्ये वेगवान अर्धशतक, शतक, द्विशतक या कसोटी सामन्यात सर्व रेकॉर्ड आज भारतीय संघाने मोडले आहेत. भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याने एका विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. रोहित शर्मा, शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांच्या आक्रमक खेळी नंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लोकेश राहुल आणि विराट कोहली यांनी आक्रमक फटकेबाजी करत संघाला मजबूत केले. भारतने पहिल्या डावात आघाडी घेतली आहे.
बांगलादेश संघाचा पहिला डाव २३३ धावावर बाद झाला. बांग्लादेश चा खेळाडू मोमिनुल हक याने शतकीय पारी खेळत एका महत्वपूर्ण टोटल पर्यंत संघाला पोहचवले.यात त्याने १९४ चेंडू खेळून १०७ धावा काढल्या यात १७ चौकार आणि एक षटकार मारला. भारतीय संघाचा स्टार बॉलर जसप्रीत बुमरा याने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीचे उत्तम उदाहरण देत ३ फलंदाजांना बाद केले. मोहम्मद सिराज , आर अश्विन आणि आकाश दीप यांनी प्रत्येकी २ बळी आपल्या नावावर केले. शेवटी २३३ धावावर संघ पूर्ण बाद झाला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी भारतीय संघ आला, यात आज चौथा दिवस असल्याने आक्रमक खेळी करण्याचे भारतीय संघाला भाग आहे. कारण फक्त एकच डाव झाला असून आता फक्त शेवटचा एकच दिवस शिल्लक आहे. भारतासाठी बतिंग करण्यासाठी आलेल्या रोहित शर्मा याने आक्रमक सुरुवात करत ११ चेंडूत २३ आक्रमक धावा करत सुरुवात दिली. त्यानंतर आलेल्या शुभमन गिल यानेही ३६ चेंडू खेळून ३९ धावा केल्या. यात ४ चौकार आणि 1 षटकार मारला. नंतर धावा वाढवण्यासाठी रिषभ पंत याला पाठवले परंतु त्याला काही खास करता आले नाही. शकीब अल हसन याने त्याला माघारी पाठवले . दरम्यान यशस्वी जयस्वाल एका बाजूला जोरदार फटकेबाजी करत राहिला. त्याने आक्रमक खेळ चालू ठेऊन ५१ चेंडू खेळून ७२ धावा केल्या यात त्याने १२ चौकार आणि २ षटकार मारले. त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघाचा स्कोर चांगलाच वाढला अवघ्या १८.२ ओवर मध्ये भारतीय संघाने १५० धावा केल्या. या धावा आज पर्यंतच्या कसोटी सामन्यातील सर्वात वेगवान धावा ठरल्या आहेत. त्यानंतर २४.४ ओवरमध्ये २०० धावा झाल्या हासुद्धा एक रेकॉर्ड आहे.
विराट कोहली याने ५९४ इनिंग मध्ये आज २७००० आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. आंतर राष्ट्रीय सामन्यात असा विक्रम करणारा भारतीय माजी खेळाडू सचिन तेंडूलकर यांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. सचिन तेंडूलकर यांच्या ६२३ खेलीमध्ये २७००० धावा झाल्या आहेत. त्यांचा हा विक्रम विराट कोहली यांनी हा विक्रम मोडला आहे. या विक्रमाची सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.
आता भारतीय संघ आजच्या चौथ्या दिवसात आक्रमक खेळी करत २८५ धावावर ९ विकेट देऊन आपला डाव घोषित केला असून. त्यानंतर पाहुण्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केल आहे. यात भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरुवात देत. २ बळी खूप लवकर काढून दिले आहेत. पहिल्या सामन्यात अस्थापैळू कामगिरी करणारा आर आश्विन याने पुन्हा एकदा खूप महव्ताची कामगिरी केली आहे. यानेच या दोन विकेट घेतल्या आहेत. भारतीय संघाकडे अजून २६ धावांची बधत आहे. आता उद्याचा शेवटचा दिवस महत्वाचा आणि निर्णायक ठरणार आहे. भारताला विजयासाठी किती टार्गेट मिळते आणि किती ओवर मध्ये पूर्ण कार्याचे हे सर्व खूप रोमांच उद्या पाहायला मिळणार आहे.