Join Whatsapp Group

Join Telegram Group

BMC JE Recruitment 2024; बृहमुंबई महानगरपालिका भरती

बृहमुंबई महानगरपालिका BMC JE Recruitment 2024 साठी जाहिरात काढली आहे. सुमारे 690 पदांसाठी पदभरती काढण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज दिनांक ११ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी काय पात्रता असणार आहे, कोणाला अर्ज करता येणार आहे याची सर्व सविस्तर माहिती खालील लेखात दिली आहे. माहिती नीट वाचून मगच आपला अर्ज भरायचा आहे.

BMC JE Recruitment 2024 Notification Details

जाहिरात नावBMC JE Recruitment 2024
भरती वर्ष२०२४
भरती विभाग  BMC
पदाचे नावजुनिअर इंजिनीअर
अर्ज भरण्यास सुरुवात११ नोव्हेंबर २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीख०२ डिसेंबर २०२४
अर्ज करण्याचे माध्यमOnline
वय मर्यादा१८ ते ३८ वर्ष
शैक्षणिक पात्रताअभियांत्रिकी विभागातील पदवी किंवा डिप्लोमा
परीक्षा दिनांकफेब्रुवारी २०२४
अश्या प्रकारे स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे. आपल्या पात्रतेनुसार विविध पद भरती आहे आपल्या साईट नुसार पदासाठी अर्ज करायचा आहे. यात गट ब आणि गट क विभागाच्या जागा भरल्या जाणार आहेत. गट ब विभागातील दुय्यम अभियंता या पदाच्या ७७ जागा आहेत. गट क विभागात कनिष्ठा अभियंता (स्थापत्य) या पदासाठी २५० जागा भरल्या जाणार आहेत. कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी व विद्युत ) या विभागाच्या १३० जागा भरल्या जाणार आहेत. अश्या प्रकारे गट ब आणि गट क विभागाच्या एकूण सुमारे ६९० जागांसाठी भरती सुरु करण्यात येत आहे. याचा फायदा नक्कीच करून घ्यायचा आहे. या पदांसाठी मिळणारा वेतनश्रेणी तपशील खालील प्रमणे असणार आहे.

BMC JE PAY SCALE

ब्रूहमुंबई महानगर पालिका भरती ( BMC JE Recruitment 2024) यातील भरती उमेदवारांसाठी वेतनश्रेणी खूप जास्त असणार आहे. गट ब आणि गट क विभागातील पोस्ट आहे.

पदाचे नावविभाग गटवेतनश्रेणीएकूण पदे
दुय्यम अभियंता (स्थापत्य)गट ब४४९०० ते १४२४०० रुपये अधिक सरकारी भत्ते२३३
दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत)गट ब४४९०० ते १४२४०० रुपये अधिक सरकारी भत्ते७७
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)गट क४१४०० ते १३२३०० रुपये अधिक सरकारी भत्ते  २५०
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत)गट क४१४०० ते १३२३०० रुपये अधिक सरकारी भत्ते१३०
एकूण पदे  ६९०

BMC JE Recruitment 2024 Education Qualification

सदर भरती हि अभियांत्रिकी विभागातील विविध पदांसाठी असून यासाठी अभियांत्रिकी विभागात पदवी किवा डिप्लोमा झालेला हवा. वेगवेगळ्या पदानुसार याची शेक्षणिक पात्रता असणार आहे. उमेदवारांनी आपल्या विभागानुसार आपण कोणत्या पदासाठी पात्र आहोत त्या पदासाठी अर्ज करायचा आहे. अधिकृत जाहिरात खाली लिंक दिली आहे pdf डाउनलोड करून पदांची शैक्षणिक पात्रता पहायची आहे.

BMC JE Recruitment 2024 Registration Fee

ब्रूहमुंबई महानगर पालिका भरती साठी परीक्षा शुल्क आपल्या कॅटेगरी नुसार वेगवेगळे असणार आहे. आपल्या कॅटेगरी नुसार पेमेंट करून अर्ज भरायचा आहे.

उमेदवाराची कॅटेगरीअर्ज फी
Un Reserved (UR)600 RS
Economically Weaker Section (EWS)600 RS
Other Backword Class (OBC)400 RS
Scheduled Caste (SC)400 RS
Scheduled Tribe  (ST)400 RS

BMC JE Recruitment 2024 Selection Process

ब्रूहमुंबई विभागातील या जुनिअर इन्गिनिअर पदासाठी १०० गुणांसाठी MCQ आधारावर लेखी परीक्षा असणर आहे. या परीक्षेकरिता १ तास ३० मिनिटे वेळ दिला जाणार आहे. या गुणाच्या आधारावर मेरीट लिस्ट लावली जाणार आहे. सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रे तपासणी साठी बोलावले जाणार आहे. सर्व कागदपत्र चेक करून अंतिम गुणवत्ता यादी लावली जाणार आहे.

How To fill Application Form BMC JE Recruitment 2024
  • सर्वात आधी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन आपली नोंदणी करायची आहे. ज्या विद्र्थ्यानी आधी अर्ज केले असेल त्यांनी user id टाकून log in करून आपला अर्ज भरायचा आहे.
  • नवीन नोंदणी करताना योग्य जाहिरात निवडून चालू भरती ची जाहिरात निवडून आपला अर्ज भरायचा आहे.
  • अर्ज भरताना आपल्या मूळ कागदपत्रावर जे नाव असेल तसेच टाकायचे आहे.
  • पासपोर्ट फोटो अपलोड करताना योग्य अपलोड करायचा आहे, ब्लर दिसणार नाही याची खात्री करायची आहे.
  • लागणारी कागदपत्रे ओरीजनल अपलोड करायची आहे.
  • माहिती पूर्ण भरून झाल्यावर फी पेमेंट करायचे आहे.
  • परीक्षा शुल्क भरण्यासाठी तुम्हाला कोणत्याही एका पर्याय वापरून पेमेंट करायचे आहे.
  • भरून झाल्यावर माहिती पुन्हा तपासून मगच फायनल सबमिट करायचा आहे.

BMC JE Recruitment Application Link

BMC JE Recruitment Apply Online – Click Here

BMC JE Recruitment PDF Notification – Click Here

JOB Updates Visit here – www.jobcy.in

Leave a Comment