Join Whatsapp Group

Join Telegram Group

Aadhaar Seeding Status Check; विविध सरकारी योजना पैसे खात्यात जमा होत नाही? आपल्या मोबाईल वरती बसून असे चेक करा!!!

Aadhaar Seeding Status

भारत सरकार विविध योजना काढत असते, आपण या योजनांचा लाभ घेत असतो. (Aadhaar Seeding Status)त्यासाठी आपण लागणारे सर्व कागदपत्र गोळा करत असतो.आपला अर्ज सायबर कॅफे मध्ये जाऊन भरतो. आपला अर्ज स्वीकारला जात असतो परंतु काही अडचणी मुळे आपल्या खात्यात सरकारी अनुदान जमा होत नाही. हि अडचण नेमकी कोणती येते? तर याचे उत्तर आहे तुमचे आधार आणि बँक हे लिंक नसणे हे मुख्य कारण आहे. हे लिंक केल्याशिवाय आपल्या खात्यात पुढील येणारे सरकारी अनुदान जमा होत नाही. आधार सीडिंग( Adhaar Seeding) असणे खूप गरजेचे असते. बँक मध्ये गेल्यावर आपल्याला हेच कळत नाही कि नेमके काय करावे. यासाठी बँक मधील कर्मचारी तुम्हाला आधार सीडिंग साठी एक फॉर्म देतील तो भरून आपले आधार seeding करून घेणे. हे adhar seeding पूर्ण झाल्यावरच तुम्हाला सरकारी अनुदान मिळणार आहे.जर तुम्हाला पण आधार बँक लिंक करायचे आहे तर तुम्ही आपले आधार बँक लिंक कुठेही जास्त न जाता एकदम सध्या पद्धतीने आणि लवकर आपले आधार बँक लिंक करू शकता. परंतु त्या अगोदर तुम्हला हे माहिती असणे गरजेचे आहे कि जर आपले आधार बँक लिंक असले तर आपल्याला कोणते लाभ मिळणार आहे.

आधार बँक लिंक करण्याचे फायदे,Aadhaar seeding status

आधार बँक लिंक असल्याचे विविध आर्थिक फायदे आहेत. यात मुख्य शेतकरी वर्ग आणि शाळेतील विद्यार्थी यांना आवश्यक आहे. शेतकरी वर्गाला शेतीच्या विविध योजना तर शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती यासाठी आधार बँक लिंक असणे आवश्यक आहे. याचे अजून बरेच काही फायदे आहेत ते खालील लेखामध्ये दिलेले आहेत.

  • विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती आणि मनरेगा पेन्शन राशी लगेच तुमच्या खात्यात जमा होत असते.
  • जर तुमचे खाते आधार लिंक केलेलं असेल तर बँक मधील होणारी धोकादारी कमी होत असते कारण तुमचा आधार लिंक केलेला असतो.
  • बँक मध्ये आधार कार्ड kyc साठी मुख्य कागदपत्र वापरले जात असते.
  • कोणत्याही सरकारी योजना, तुम्हाला मिळणारी gas subsidy याची सर्व रक्कम तुमच्या आधार लिंक असलेल्या खात्यात जमा होत असते.
  • जर तुमचे बँक खाते आधार लिंक (Adhaar Seeding) केल असेल तर तुम्हाला आपल्या खात्यातील रक्कम भारतात कुठेही काढता येणार आहे.
  • तुमच्या आधार कार्ड वरून तुम्ही तुमचे पैसे कुठेही काढू शकता.
  • आधार लिंक असलेले खाते तुम्हाला आर्थिक व्यवहार करण्यासाठी खूप महत्वाचे आणि गरजेचे आहे.

How to check adhar link status npci; असे करा चेक तुमचे आधार स्टेटस

सर्व सरकारी अनुदानासाठी आधार लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुमचे आधार सीडिंग झाले नसेल तर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजना चा आर्थिक लाभ मिळत नाही. तर यासाठी आपले बँक खाते आधार लिंक आहे कि नाही हे कसे समजणार? तर खाली माहिती दिली आहे त्या प्रकारे तुम्ही आपले बँक आधार लिंक npci ला लिंक आहे कि नाही हे तपासून पाहू शकता.

  • सर्वात आधी आधार च्या संकेतस्थळावर जायचे आहे.
  • आधार च्या uidai.gov.in यावर क्लिक करायचे आहे.
  • यामध्ये तुम्हाला आधार विषयी वेगवेगळे पर्याय दिसणार आहेत.
  • Adhaar Services या पर्यायाचा वापर करून तुम्हाला तुमचे बँक स्टेटस बघता येणार आहे.
  • Adhaar Linking Status यावर क्लिक करायचे आहे.
  • नंतर तुमच्या समोर अंगठ्याचे निशाण दिसणार आहे, खाली log in ला क्लिक करायचे आहे.
  • नंतर तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. यात तुमचा मोबाइल क्रमांक आधार कार्ड सोबत लिंक असणे गरजेचे आहे. आधार सोबत जोडलेला मोबाइल क्रमांकावर sms जात असतो.
  • आधार नंबर टाकल्यावर कॅप्चर कोड टाकून log in with otp करायचे आहे.
  • मोबाइल नंबर जो लिंक केला असेल त्यावर आलेला otp टाकायचा आहे.
  • otp टाकल्यावर तुमच्या समोर विवध पर्याय दिसणार आहेत. यात तुम्हाला तुमचे आधार कार्ड download आणि Aadhaar PVC Card आणि आधार पत्ता बदल करणे व त्यानंतर तुम्हाला तुमचे बँक खाते लिंक आहे कि नाही हा पर्याय दिसणार आहे.
  • Bank Seeding Status या पर्यावर क्लिक करून आपले बँक खाते आधार लिंक आहे कि नाही ते दिसणार आहे.
  • तुमच्या ज्या बँक मध्ये खाते असेल असे बँक खाते समोर दिसनर आहे.
  • आधार लिंक हे तुमच्या ज्या बँक खात्यात शेवटी लिंक केल असेल ते खाते आधार सीडिंग दाखवत असते.

अश्या प्रकारे घरी बसून तुम्ही तुमचे बँक खाते आधार सीडिंग आहे कि नाही हे तपासून पाहू शकता. फक्त ५ ते १० मिनिटामध्ये चेक करू शकता.

आपल्या बँक शाखेमध्ये जाऊन असे करा लिंक;Home brach

जर तुम्हाला आपले आधार बँक लिंक करायचे आहे तर तुम्ही तुमच्या बँक खाते असलेल्या शाखेमध्ये जाऊन आपले आधार सीडिंग करू शकता.

  • बँक मध्ये तुमचे इ आधार किंवा आधार कार्ड द्यावे लागणार आहे.
  • यासोबत आधार लिंक (Adhaar Seeding) चा फॉर्म भरून द्यावा लागणार आहे.
  • या फॉर्म सोबत आधार कार्ड आणि अन्य kyc कागदपत्रे जोडावे लागणार आहेत.
  • बँक मधील कर्मचारी तुमचा अर्ज घेऊन जेव्हा ते लिंक करतील त्यावेळी तुमचे आधार बँक लिंक होणार आहे.
  • लिंक केल्यावर वेरीफीकेषण प्रक्रिया होत असते ती पूर्ण झाल्यावर लिंकिंग होत असते.

हि प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमच्या मोबाईल नंबर ला एक SMS येणार आहे. ज्यात एक तर आपले आधार बँक लिंक झालेले असेल किंवा काही पूर्तता किवा काही अडचण असेल तर REJECTED चा SMS येत असतो. लिंक केल्यानंतर तुम्ही घरी बसून आपले आधार लिंक (Adhaar Seeding) झाले आहे किंवा नाही ते तपासून पाहू शकता.

Net Banking च्या माध्यमातून तुम्ही आधार लिंक करू शकता

इंटरनेट बँकिंग (Net Banking) च्या माधमातून तुम्ही आपले आधार लिंक करू शकता किंवा आपले आधार लिंक आहे कि नाही हे तपासून पाहू शकता.

  • यासाठी तुमच्या बँक च्या Net Banking या संकेतस्थळावर जाऊन log in करायचे आहे.
  • आपल्या बँक खात्याच्या आधार लिंक या पर्यायवर जायचे आहे.
  • आपला खाते क्रमांक निवडायचा आहे आणि आधार नंबर टाकून सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • पुढील स्क्रीन वरती तुमच्या मोबाईल नंबर चे शेवटचे दोन अंक दिसतील.
  • तुम्हाला तुमच्या फोन वरती तुमचे खाते लिंक आहे कि नाही याचा msg येऊन जाईल.

यात आधार लिंक करण्याची हि प्रक्रिया वेगवेगल्या बँक नुसार वेगळी असणार आहे.

हे पण वाचा- Aadhaar pan link कसे करायचे

मोबाइल ऐप च्या माध्यमातून तुमचे बँक खाते लिंक करा

बँक खाते लिंक करण्याचा दुसरा पर्याय हा आहे कि तुमच्या बँक चे मोबाइल बँकिंग साठी official app असते त्या app वरून तुम्हाला आपले खाते लिंक करता येणार आहे. खाते लिंक आहे कि नाही याची स्थिती तुम्हाला या app च्या माध्यमातून कळणार आहे. यासाठी हे app असणे आवश्यक आहे आणि काही स्टेप्स आहेत त्या पूर्ण करून आपली स्तिती पाहता येणार आहे.

  • सर्वात आधी तुमच्या बँक खाते असलेले बँक चे ओफ़्फ़िकिअल app डाऊनलोड करायचे आहे.
  • आपल्या बँक खात्याला मोबाइल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.
  • आपला registration id टाकून log in करायचे आहे.
  • app मध्ये तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसणार आहेत, त्यापैकी ‘आधार लिंक’ यावर क्लिक करायचे आहे.
  • तुमचा आधार नंबर आणि बाकीची माहिती टाकून सबमिट करायचे आहे.
  • तुमचे आधार लिंक स्टेटस दिसणार आहे.

बँक मध्ये न जाता तुम्हला तुमचे आधार लिंक मोबाइल च्या माध्यमातून तपासून पाहता येणार आहे.

Leave a Comment