Join Whatsapp Group

Join Telegram Group

मुलीच्या भविष्यासाठी सर्वोत्तम गुंतवणूक “सुकन्या समृद्धी योजना” 2024

आकर्षक व्याजदर, आपल्या मुलीचे स्वप्न पूर्ण करा.

सुकन्या समृद्धी योजना

जर तुमच्या घरात कोणी लहान मुलगी असेल तर तिच्या भविष्याची चिंता सोडा… भारत सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन आपल्या मुलीच्या भविष्यातील खर्चाची काळजी या योजनेच्या लाभाने कमी होईल. भारत सरकारने काढलेल्या या योजनेचे नाव आहे ‘ सुकन्या समृद्धी योजना ‘ फक्त मुलींच्या भविष्यासाठी आणि बेटी सशक्ती योजना यासाठी सदर योजना काढली आहे. यात आकर्षक असे व्याजदर मिळत असते. तेही चक्रवाढ व्याजाने मिळत असते. भारतीय डाक विभाग आणि बँक यापैकी कोणत्याही एका ठिकाणी सुकन्या समृद्धी खाते खोलले जाते. आवश्यक आणि सविस्तर माहिती खालील लेखामध्ये देत आहे काळजीपूर्वक माहिती वाचून आजच आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करा. भविष्यातील आर्थिक मदतीची आजच बचत सुरु करा.

आपल्या मुलीच्या भविष्यासाठी सुकन्या संरुद्धी योजना महत्वाची का आहे ?

आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी सर्वात चांगला पर्याय

आजच गुंतवणूक करून आपल्या मुलीचे भविष्य संरक्षित करा.

योजना का सुरु करण्यात आली?

सदर योजना भारत सरकारने बेटी पढाओ बेटी बचाओ या मोहिमेचा एक भाग म्हणून महिला सक्षमीकरण आणि मुलीची झालेली कमी संख्या याच्या उद्देशाने काढली आहे. सदर योजना पालकांना मुलीच्या भविष्यासाठी आर्थिक सहय्य मिळून देत असते.

सुकन्या समृद्धी योजना खाते कोण उघडू शेकते ?

० ते १० वर्ष वायोगातील मुली या योजनेसाठी पात्र आहेत. एका मुलीच्या नावावर फक्त एकच खाते उघडता येते. जास्तीत जास्त दोन मुलींच्या नावाने पालक खाते उघडून या योजनेचा लाभ घेता येत असतो.

सुकन्या समृद्धी योजनेचे प्रमुख फायदे-

  1. आकर्षक व्याजदर –या योजनेला भारत सरकार नेहमी चांगले व्याज देत असते. इतर बचत योजनेपेक्षा या योजनेला नेहमी जास्त व्याज असते.
  2. कर लाभ – या योजनेमधील मिळणारे व्याज हे करमुक्त असते. रकमेवर कोणत्याही प्रकारचा कर लागत नाही.
  3. बचत कालावधी जास्त – सदर योजना हि २१ वर्षाची आहे. यात १५ वर्ष आपण पैसे भरायचे त्यानंतर ६ वर्ष भारत सरकार व्याज देत राहणार आहे आणि २१ वर्ष पूर्ण झाल्यवर व्याजासहित रक्कम काढता येते.
  4. सर्वात कमी रक्कम – या योजनेचे खाते केवळ २५० रुपये भरून चालू होत असते. त्यानंतर ५० च्या पटीत रक्कम जमा करता येईल.
  5. सरकारी योजना – सदर योजना हि भारत सरकारमार्फत चालवली जात असते. त्यामुळे या योजनेची पारदर्शकता आणि सुरक्षितता चांगली आहे.
  6. खाते उघडणे आणि जमा करणे खूप सोपे आहे.

खाते कसे आणि कोठे उघडावे?

सुकन्या समृद्धी योजना हि भारतीय डाक विभाग आणि बँक या दोन ठिकाणी चालू आहे. जे आपल्या सोयीचे हे असे योग्य ठिकाण निवडून आपन या योजनेचा लाभ घ्यावा.

आवश्यक कागदपत्र

सदर योजनेसाठी खूप जास्त कागपत्रे लागत नाही, त्यासाठी फक्त मुलीचा आधार, जन्म दाखला आणि आई किंवा वडील यापैकी एकाचा आधार कार्ड आणि प्यान कार्ड व ३ पासपोर्ट साईज फोटो एवढेच कागदपत्रे लागत असतात.

योजनेची मर्यादा –

या योजनेत एका आर्थिक वर्षात कमीत कमी ५०० आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करत येतात. सदर खाते हे २१ वर्ष कालावधीसाठी बांधले जात असते. मध्ये बंद करता येत नाही अपवाद – मयत.

मुलीच्या शिक्षण आणि लग्न –

सदर योजनेमध्ये मुलगी १२वी आणि तिच्या पुढील शिक्षणसाठी तुम्हाला जमा रकमेतून ५०% रक्कम काढता येत असते. तिच्या लग्नासाठी सुद्धा रक्कम काढता येत असते.

सुकन्या समृद्धी योजना हि मुलीच्या भविष्यासाठी एक उत्तम बचत मार्ग आहे. उच्च व्याजदर, करमुक्त व्याज आणि जास्त कालवधी बचत यामुळे हि योजना खूप लाभदायी ठरते. जर आपल्यला आपल्या मुलीच्या भविष्यासाठी निधी जमा कारायचा असेल तर हि योजना एक उत्तम पर्याय आहे. अधिक माहितीसाठी आपण आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस किवा बँक ला भेट देऊन माहिती घेउ शकता. 

Postal Life Insurance 2024

Leave a Comment