Ration Card EKYC : राशन कार्ड आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचा आहे, महत्वाचे म्हणजे पांढरे, केशरी आणि पिवळे राशन कार्ड धारकांसाठी. पिवळे आणि केशरी राशन कार्ड धारकांना सरकारकडून मोफत किंवा कमी किमतीत अन्नधान्य मिळते. सरकारने सर्व राशन कार्ड धारकांना ई केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत, अन्यथा त्यांना राशन मिळणे बंद होऊ शकते. या प्रक्रियेसाठी 31 मार्च 2025 पर्यंतचा कालावधी दिला आहे, ज्यामध्ये राशन कार्ड धारकांना घरबसल्या मोबाईलद्वारे केवायसी पूर्ण करण्याची सुविधा सरकारने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी, गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ‘मेरा ई केवायसी’ मोबाईल ऑप डाउनलोड करायचे आहे. त्यानंतर, आधार फेस रीड सर्विस ऑप देखील डाउनलोड त्यासोबतच डाउनलोड करायचे आहे या प्रक्रियेमुळे राशन कार्ड धारकांना अधिक सोयीस्करपणे केवायसी पूर्ण करता येईल, ज्यामुळे त्यांना अन्नधान्य मिळवण्यात कोणतीही अडचणी येणार नाहीत.
Ration Card EKYC mobile app
सेटअप केल्यानंतर, तुम्हाला ॲपमध्ये व्हिडिओ किंवा फोटो घेण्यासाठी परमिशन द्याची आहे. “व्हाईल युजिंग द ॲप” या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही पुढे जाल. त्यानंतर “मेरा ई केवायसी” ॲप उघडून तुम्हाला आवश्यक माहिती भराची आहे. सर्वप्रथम, तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे. राज्य निवडल्यानंतर “व्हेरिफाय लोकेशन”चा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. काही वेळा लोकेशन ट्रॅक होत नाही, अशा वेळी मोबाईलमध्ये लोकेशनचा ऑप्शन सुरूकरायचे आहे. लोकेशन व्हेरिफाय झाल्यावर, ॲप तुम्हाला आधार नंबर विचारेल, जिथे तुम्ही तुमचा किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाचा आधार नंबर टाकायचा आहे.
How to complete Ration Card EKYC
त्यानंतर “जनरेट ओटीपी” नावाचा ऑप्शन येईल, त्यावर क्लिक केल्यावर आधार लिंक नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर, कॅप्चा कोड भरून “सबमिट” बटनावर क्लिक करायचे आहे. यानंतर, बेनिफिशरी डिटेल्स दिसतील आणि केवायसी प्रक्रिया सुरू होईल. या डिटेल्सच्या खाली “फेस ई केवायसी”वर क्लिक केल्यावर कन्सेंटचा फॉर्म उघडेल, जिथे तुम्हाला “एक्सेप्ट”वर क्लिक करणे आवश्यक आहे. आधार फेस रीडसाठी कॅमेरा वापरण्यासाठी परमिशन मागितली जाईल, त्यावर “व्हाईल युजिंग द ॲप”वर क्लिक करायचे आहे.
आधार ऑथेंटिकेशनसाठी तुम्हाला काही स्टेप्स दिल्या जातील, जसे की चेहरा दाखवणे आणि डोळे पिलकवणे. या स्टेप्स स्वीकारण्यासाठी, तुम्हाला बॉक्सवर क्लिक करून “प्रोसिड”च्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. कॅमेरा इंटरफेस उघडल्यावर, तुमचा चेहरा आणि डोळे व्यवस्थित दाखवणे आवश्यक आहे. हे सर्व पूर्ण झाल्यावर, तुमचे ई केवायसी यशस्वीपणे पूर्ण होईल. ई केवायसी बरोबर झालंय की नाही हे पाहण्यासाठी, तुम्हाला परत “मेरा केवायसी” ॲपवर जाऊन राज्य निवडून लोकेशन व्हेरिफाय करा. आधार नंबर टाकल्यानंतर, तुम्हाला पुन्हा एक ओटीपी येईल, जो टाकल्यानंतर कॅप्चा कोड भरून तुमच्या बेनिफिशरी डिटेल्स पाहता येतील.
ई केवायसी स्टेटस समोर येत असल्यास, तुम्हाला समजेल की तुमचं ई केवायसी यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. ही प्रक्रिया 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण करायची आहे, त्यामुळे लवकरात लवकर ही केवायसी पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला आणखी कोणत्याही योजनेची माहिती हवी असेल किंवा कोणत्याही सर्विसची प्रक्रिया जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. याशिवाय, 🪀 करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज आपल्या लाडक्या whtsapp वर ! आपल्या Whtsapp प्रायव्हेट ग्रुपला खाली दिलेल्या लिंकला जॉईन होऊ शकता. आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील हा मॅसेज नक्की पाठवा 👉
https://chat.whatsapp.com/Kwtk3jY4hAM9AffbNYKx2z
☝वरील लिंक ही प्रायव्हेट community ग्रुपचि असून तुमचा नंबर 💯 Secure राहील. आणि फक्त तुमचा नंबर Admin बघु शकेल त्यामुळे निश्चित रहा आम्ही कुठल्याही प्रकारे नंबर विकत नाही
धन्यवाद….!✨💫🙏