आधार आणि पॅन कार्ड लिंक बाबतीत खूप अडचणी येत असतात. नेमक Adhar Pan Link करणे म्हणजे काय करायचे? तुम्हाला पण आधार पॅन लिंक करावे लागणार आहे का याची माहिती आज आपण या लेखामध्ये बघणार आहोत. आजच्या digital जगात आधार हे एक प्रमुख आणि मुख्य ओळखपत्र झाले आहे. आधार आणि पॅन कार्ड हे खूप महत्वाची कागदपत्रे आहेत. या कागदपत्रांची आवश्यकता सर्वच ठिकाणी पडत असते. बँक मध्ये खाते खोलण्यासाठी असो किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी या कागदपत्रांची गरज पडत असते. बऱ्याच लोकांना हेच कळत नाही कि आधार पॅन लिंक करणे म्हणजे काय करायचे? आपले आधार आणि पॅन लिंक आहे कि नाही ते कस चेक करावे. यासंदर्भात सर्व माहिती खाली बघणार आहोत.
Check Adhaar Pan Link Status
सरकार ने पॅन आणि आधार लिंक करणे अनिवार्य केलेले आहे. आजच तुमचे adhar pan link status check तपासून जर लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्यावा. तुम्ही घरी बसून status बघू शकता आणि बँकिंग सुविधा आणि इतर ठिकाणी येणाऱ्या अडचनी येणार नाहीत. तुमचे जर आधार आणि पण लिंक नसेल तर बँकिंग आणि income tax मध्ये काही मिळणाऱ्या सवलतीचा लाभ मिळणार नाही.
असे करा चेक आधार पॅन लिंक, check status
अधिकृत वेबसाईट वर सर्वात आधी income tax च्या ई-फायलिंग पोर्टल वरती जायचे आहे.
त्यांनतर Quick Link सेक्शन वरती क्लिक करून Adhar status हा पर्याय निवडून पुढे जायचे आहे.
त्यानंतर आधार नंबर आणि पॅन नंबर टाकायचा आहे.
View Link Adhaar Status या बटनावर क्लिक करून तुमचे आधार आणि पॅन लिंक आहे किंवा नाही याचा तपशील मेसेज समोर दिसणार आहे.
आधार पॅन लिंक करा घरी बसून
आधार आणि पॅन लिंक तुम्ही तुमच्या मोबाईल फोन वरून करू शकता. यासाठी तुम्हला काही स्टेप्स आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत.
सर्वात आधी तुम्हाला Income Tax E Filling वरती जावे लागणार आहे.
यात Quick Links या पर्यायावर क्लिक करावे.
नंन्तर समोर काही पर्याय दिसणार आहेत यामध्ये Link Adhaar का क्लिक करायचे आहे.
तुमचा आधार क्रमांक आणि पॅन नंबर टाकायचा आहे. validate details वरती क्लिक करून तुमचे नाव आणि मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे.
लिंक बटनावर क्लिक करायचे आहे.
तुमच्या मोबाईल वरती एक OTP आला असेल तो टाकावा लागणार आहे आणि otp verify करायचा आहे.
सर्व माहिती भरून झाल्यावर तुमचा आधार पॅन लिंक होणार आहे.
SMS द्वारे चेक करा आधार-पॅन लिंक आहे कि नाही
तुमचा जो मोबाईल नंबर लिंक केलेला असेल त्या मोबाईल क्रमांकावरून UIDPAN टाइप करायचे आहे.
UIDPAN टाइप करून स्पेस द्यावा लागणार आहे आणि त्यानंतर १२ अंकी आधार क्रमांक आणि तुमचा १० अंकी पॅन नंबर टाकायचा आहे.
सर्व माहिती टाकल्यावर तुम्हाला ५६७६७८ किंवा ५६१६१ या नंबर ला टाइप केलेला मेसेज पाठवायचा आहे.
मेसेज पाठवल्यावर रेप्ले मध्ये आधार- पॅन लिंक कॅनफार्मेषण चा मेसेज आला असेल.
अश्या प्रकारे तम्ही तुमच्या मोबाईल मध्ये घरी बसून आधार- पॅन लिंक आहे किंवा नाही हे तपासून पाहता येणार आहे आणि जर ते लिंक नसेल तर घरूनच लिंक करून घेऊ शकता. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार- पॅन लिंक करणे आवश्यक आहे.
अधिकृत वेबसाईट | यथे पाहा |