Ladaki bahin yojana maharastra :
महाराष्ट्र सरकारने चालू केलेल्या माझी लाडकी बहिण या योजनेचा तिसरा हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे. महिलांना दर महिन्याला १५०० रुपये थेट हस्तांताराद्वारे मिळून महिला सशक्तीकरणाचा उद्देशाने काढलेली हि योजना आहे. या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्त्याचा लाभ घेतला आहे. या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील कोट्यावधी महिलानी अर्ज केले होते या सर्व लाभार्थ्यांना पहिला आणि दुसरा हप्त्याचे पैसे त्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यात जमा होऊन त्याचा लाभ घेतला होता. आता या योजनेचा तिसरा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्व महिला वर्गाचे लक्ष लागले होते. तर आता हि प्रतीक्षा संपली असून लाडक्या बहिणीच्या खात्यात ४५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
या योजनेचा तिसरा हप्ता आजपासून जमा होत आहे . ज्या लाभार्थ्यांचे बँक आणि पोस्ट ऑफीस मधे खाते असून सदर खाते आधार लिंक असणे आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यांचे एकही हप्ता जमा झाला नव्हता त्याच महिलांचे पैसे येण्यास सुरुवात झाली असून ते पैसे त्यांच्या आधार लिंक बँक खाते किंवा पोस्ट खात्यात जमा झाले आहेत . बँक खाते हे आधार लिंक असणे आवश्यक आहे. जर तुमचे खाते आधार लिंक नसेल तर ते खाते लवकर लिंक करून घ्यावे. त्याशिवाय तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाही. जर तुमचे बँक खाते आधार लिंक नसेल तर या लाभापासून अजून वंचित राहू शकता आधार लिंक (adhar seeding) असणे गरजेचे आहे.
या महिला लाभार्थ्यांना मिळाले 4500 रू Ladaki bahin Yojana update…
Maharashtra सरकार ने महिलांसाठी चालू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना या योजनेचा लाभ महिला वर्गाने चांगलाच घेतला आहे . पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झाले होते. आता तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा होती, तर ही प्रतीक्षा संपली असून 4500 रुपये येण्यास सुरुवात झाली आहे . तुमच्या आधार लिंक असलेल्या खात्यात पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याची रुपये 4500 जमा झाले आहेत.यात ज्या महिलांना पहिल्या 2 हप्त्याची रक्कम आधी मिळाली होती त्यांना अजून आलेली नाही. आज केवळ ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांनाच 4500 रुपये जमा झाले आहेत . सुरुवातीला दोन हप्त्याचा लाभ घेतलेल्या महिला लाभार्थ्यांना सुद्धा लवकरच आपल्या तिसऱ्या हप्त्याची पैसे मिळणार आहेत .
Maji Ladki Bahin Yojana योजना तपशील
योजनेचे नाव | Majhi Ladki Bahin Yojana |
लाभ | महिलांना दरमह १५०० रुपये |
कोणी सुरु केली | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
योजनेची सुरुवात | २८ जून २०२४ |
लाभार्थी कोण | महाराष्ट्र राज्यातील महिला |
वय मर्यादा | २१ ते ६५ वर्ष |
योजनेचा उद्देश | महिला सशक्तीकरण आणि महिलांना आत्मनिर्भर बनवणे |
मिळणारी धनराशी | १५०० रुपये प्रती महिना |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ३० सप्टेंबर |
अर्ज प्रक्रिया | Online/offline |
Official website | Majhi ladaki bahin yojana |
Maharastra Gov. Scheme 2024
शासनाने चालू केलेल्या या योजनेचा वरीलप्रमाणे तपशील आहे. त्याप्रमणे लाभार्थ्याला लाभ मिळत आहे. आता या लाभाच्या तिसर्या हप्त्याचे वितरण चालू झाले आहे. यात त्यांनी ज्या लाभार्थी महिलांना अद्याप एकही हप्त्याचे पैसे मिळाले नाही त्यांच्या खात्यात ४५०० रु जमा केले आहेत.
अजूनही काही महिला वर्ग या योजनेचा लाभापासून वंचित आहेत, या योजनेचा लाभ घेतला नाही. अर्ज करण्याचे आता शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ज्यांनी अजून अर्ज केला नाही त्यांनी मुदत संपण्याच्या आता आपला अर्ज भरून या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच ज्या महिलांचे बँक खाते लिंक नसेल त्यांनी आपले बँक खाते आधार लिंक करून घेणे. आधार लिंक नसेल तर पैसे जमा होत नाही.
फॉर्म approved तरीही पैसे जमा झाले नाही काय करावे ?
तुमचा फॉर्म approve झाला तरीसुद्धा पैसे जमा झाले नसतील तर काय करावे? यासाठी तुमचे खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे. दिलेले खाते जॉईन खाते नसावे. नवरा बायको यांचे संलग्न खाते चालत नाही. तुमच्या खात्याची kyc नसणे अशी बरीच करणे आहेत. त्यामुळे जर तुमचे खाते लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्यावे.