IND VS BAN – पहिल्या सामन्यात अश्विन-जडेजा स्टार गांगुली बोलले ‘बांग्लादेश ने पाकिस्तान ला….’
Ind vs ban1st टेस्ट २०२४ | चेन्नई – १९ सप्टेबर पासून चालू झालेल्या भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी सामना पहिल्याच दिवशी रंगात आल्याच पाहायला मिळत आहे. तर भारताचे स्टार फिरकी गोलंदाज आर अश्विन आणि सर जडेजा यांनी आपल्या फलंदाजीत कमाल केल्याची दिसून आले आहे. या जोडीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवशी अजय बढत मिळवली आहे. सुरवातीला भारतीय संघाकडून भारताचे स्टार खेळाडू कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली अनुक्रमे ६-६ धावा करून बाद झालेत. तर शुभमन गिल याला तर आपले खाते उघडता आले नाही. रिषभ पंत याने ३९ धावांची खेळी करून आपल्या चाहत्यांना जागे केल. सर्व खेळाडू लवकर बाद झाल्यावर भारतचे all raundar खेळाडू सर जडेजा आणि रवी अश्विन यांनी चांगली खेळी करून भारताला मजबूत स्तीतीत आणण्याचे काम केल आहे. त्यांनी सातव्या विकेटसाठी पाहुणा संघ बांगलादेशला खूप तरसवले. भारतीय संघाने पहिल्या दिवसाखेर ८० षटकात ६ बाद ३३९ धावा केल्या.
भारतीय संघाकडून रवी अश्विन सर्वाधिक धावा केल्या, त्याने २ षटकार आणि १० चौकाराच्या मदतीने ११२ चेंडूत १०२ धावांची शतकिय इनिंग खेळून भारतीय संघ बळकट केला. त्याला साथ सर जडेजा यांनी दिली ८६ धावांसह नाबाद टिकून आहे. यशस्वी जयस्वाल ५६ धावा करून बाद झाला. तर kl राहुल १६ धावा करून मेहदी हसन याचा शिकार झाला. यात यशस्वी इनिंग खेळणाऱ्या अश्विन आणि जडेजा यांच्या संयमी खेळीचे सर्वच स्तरावरून कौतुक केल जात आहे. भारतीय संघाचे हाल इतके झाले होते कि ४२.२ षटकात भारताची धावसंख्या ६ बाद १४४ असी होती. भारतीय संघ अडचणीत असताना रवी अश्विन यांची शतकीय खेळी खूप महत्वाची ठरणार आहे. अश्विन ला साथ देणाऱ्या सर जडेजा यांनी सुद्धा पाहुण्या संघाचा चांगलाच समाचार घेतला. चेन्नई मधील चेपॉक मैदानावर सलामीचा पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे.
भारतीय संघाचे माजी खेळाडू अश्विन आणि जडेजा यांचे तोंड भरून कौतुक करत आहेत. सौरभ गांगुली यांनी देखील या जोडीची स्तुती करताना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या दरम्यान झालेल्या मालिकेचा दाखला दिला. पहिले आर अश्विन याने संयमी खेळी करून सर जडेजा याने डाव सावरला. केवळ धावाच नाही तर आपल्या फलंदाजीचा उत्तम दर्जा दाखवला. बांगलादेश एका अतिश्याय चांगल्या गोलंदाज विरुध्द चागले फटके मारत आपल्या शतक पूर्ण केल.
भारत विरुद्ध बांग्लादेश 1st टेस्ट भारतीय संघ-
रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमरा, आकाश दीप, मोहमद सिराज .