Join Whatsapp Group

Join Telegram Group

MPSC Agriculture Recruitment 2024 एमपीएससी कृषी सेवा अंतर्गत 258 पदांसाठी भरती सुरू जाणून ! घ्या अर्जप्रक्रिया..!

MPSC Agriculture new notification 2024,Latest updates on MPSC Agriculture Recruitment 2024,MPSC Agriculture recruitment 2024 application deadline,MPSC Agriculture exam syllabus changes 2024,MPSC Agriculture Recruitment admit card 2024,MPSC Agriculture Vacancy 2024 // www.jobcy.in

MPSC Agriculture Recruitment 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत कृषी सेवा विभागात विविध पदांसाठी भरती काढली आहे. पात्र उमेवारांकडून अर्ज मागविण्यात आहे आहेत. यासाठी पात्रता काय आहे, कोण अर्ज करू शकतो अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे याची सर्व माहिती आज आपण सविस्तर बघणार आहोत. पदांचा तपशील व त्याची सर्व माहिती खाली दिलेली आहे . माहिती पूर्ण वाचून अचूक माहिती भरून आपला अर्ज दाखल करावा .
सरकारी अधिकारी बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ही माहिती उपयुक्त आहे. या भरतीसाठी असणारी पात्रता आणि निकष खाली सविस्तर दिलेले आहेत , तसेच अधिकृत जाहिरात बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून पूर्ण तपशील पहावा .

पदाचे नाव :

  1. उप संचालक कृषी, गट (अ)
  2. तालुका कृषी अधिकारी/ तंत्र अधिकारी गट (ब)
  3. कृषी अधिकारी,कनिष्ठ व इतर गट (ब)

पात्रता – MPSC Agriculture Eligibility 2024

उमेदवार भारताचा नागरिक असावा .
वय – १९ ते ३८ खुला वर्ग , मागासवर्ग अनाथ , प्रावीण्य प्राप्त खेळाडू , माजी सैनिक ,आणीबाणी व अल्पसेवा राजदिस्थ अधिकारी या सर्वांसाठी ५ वर्ष सुट म्हणजे या उमेदवारांना वयाच्या ४३ वर्ष पर्यंत अर्ज करता येणार आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी वयाच्या ४५ पर्यंत म्हणजे त्यांना ७ वर्ष सूट देण्यात आली आहे.
वरील विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीमध्ये शिथिल केली जाणार नाही .

वेतनश्रेणी – निवड झालेल्या उमेदवारांना २१००० ते ४१००० रुपये मासिक तसेच इतर सरकारी भत्ते मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्रात असणार आहे.

अर्ज स्विकारण्याची दिनांक –
27 सप्टेंबर 2024 पासून या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे
अर्ज स्विकारण्याची पद्धत – सदर अर्ज स्विकारण्याची ऑनलाईन स्वरूपाची आहे. यात तुम्हाला अर्ज ऑनलाईन भरावा लागणार आहे.
भरती कालावधी – कायमस्वरूपी सरकारी अधिकारी होण्यासाठी खूप मोठी संधी आहे.

शैक्षणिक अहर्ता –
महाराष्ट्र कृषी सेवा अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे त्याची शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त संस्थेकडून कृषी किंवा कृषी अभयांत्रिकी अथवा उद्यानविद्या या विषयातील पदवी किंवा त्याच विद्याशाखेतील अन्य कोणत्याही समतुल्य अहार्ता.
समतुल्य अहृता म्हणजे यात काही कृषी संधभातील पदव्यांचा समवेश करण्यात आला आहे. त्याची यादी खालीलप्रमाणे असणार आहे.

१) बी एस सी उद्यानविद्या
२) बी एस सी सामाजिक विज्ञान
३) बी टेक कृषी अभयांत्रिकी
४) बी एस सी वणविद्या
५) बी एफ एस सी मत्स्य विज्ञान
६) बी टेक अन्न तंत्रज्ञान
७) बी टेक जैवतंत्रज्ञान
८) बी एस सी कृषी व्यवसाय व्यवस्थपन

या सर्व मान्‍यताप्राप्त विद्यापीठातुन पदवी प्राप्त केल्याल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.
यामधे जर तुम्ही पदवीच्या शेवटच्या वर्षात असल तर तुम्ही या परीक्षेच्या पूर्व परीक्षेला पत्र असाल. परंतु मुख्य पेपर साठी तुम्हाला पदवीचा निकाल सादर करावा लागणार आहे.

अर्ज भरती प्रक्रिया तपशील: MPSC Agriculture Notification 2024

अ.क्रमांकतपशीलविहीत कालावधी
1अर्ज सादर करण्याचा कालावधी27 सप्टेंबर 2024 ते 17 ऑक्टोबर 2024
2परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक17 ऑक्टोबर 2024
3चलणद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख21 ऑक्टोबर 2024 रोजी बॉकेच्या कार्यलयीन वेळेत भरावे
4अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
5जाहिरात PDFयेथे क्लिक करा
6अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

कोणत्या पदासाठी किती जागा?

  • उप संचालक कृषि या पदासाठी एकूण 48 जागा भरायच्या आहेत.
  • तालुका कृषि अधिकारी या पदांसाठी एकूण 53 इतक्या जागा भरायच्या आहेत.
  • कृषि अधिकारी, कनिष्ठ व इतर या पदांसाठी एकूण 157 इतक्या जागा भरायच्या आहेत.
अर्ज कसा करायचा ? MPSC Agriculture Application Form 2024

How to apply for MPSC Agriculture Recruitment 2024

आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२४ साठीचा अर्ज पद्धत खालीलप्रमाणे असणार आहे .
१) जर उमेदवाराने एमपीएससी च्या या आधी काही परीक्षा दिल्या असतील तर पुन्हा नव्याने नोंदणी करण्याची गरज पडणार नाही. तुमच्या आधीचा डाटा आयोगाच्या संकेस्थळावर असतो तोच वापरला जात असतो.
२) युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यावे.
३) लॉग इन केल्यावर check Eligibility यावर क्लिक करून उमेदवाराची पात्रता तपासून मगच तुम्हाला अर्ज करता येणार आहे.
४) तुमची पात्रता तपासल्यावर तुम्ही ज्या पदासाठी पात्र आहेत त्या पदाचा अर्ज नीट काळजीपूर्वक भरावा .
५) अर्ज भरताना तुमचा योग्य मोबाईल नं आणि ईमेल आयडी वापरावा . इतर कोणाचा देऊ नये.
६) ३ महिन्याच्या आतील चांगला स्पष्ट फोटो अपलोड करावा . सही क्लिअर यायला पाहिजे .
७) आवश्यक कागदपत्रे ओरिजनल अपलोड करावी.
८) अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांनी आपला अर्ज लवकर भरावा, नंतर वेबसाईट नीट चालत नाही अर्ज भरण्यास खूप अडचणी येतात आणि आपला अर्ज भरायचा राहून जातो . म्हणून लवकर आपला अर्ज भरावा.

FDA Recruitment 2024

Leave a Comment