Join Whatsapp Group

Join Telegram Group

मार्च महिन्यातील चालू घडामोडी २०२४

मार्च महिन्यातील चालू घडामोडी २०२४

🤷🏻‍♂️ अलीकडेच भारताच्या संसद सुरक्षेच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

👉 उत्तरअनुराग अग्रवाल

🧐 हे पण वाचा

▪️ IPS अधिकारी अनुराग अग्रवाल यांची संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.

▪️ त्यांच्या नियुक्तीचा आदेश लोकसभा सचिवालयाने गुरुवारी जारी केला – परंपरेने हे पद आयपीएस अधिकाऱ्यासाठी राखीव असते.

▪️ अनुराग अग्रवाल हे आसाम-मेघालय कॅडरचे 1998 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते CRPF मध्ये महानिरीक्षक आहेत, यांची तीन वर्षांसाठी सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.

▪️ संयुक्त सुरक्षा सचिव हे संसद भवनाच्या सुरक्षा सेवेचे प्रमुख असतात. रघुबीर लाल यांची यूपीमध्ये बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते,

▪️ त्यांची 20 ऑक्टोबर रोजी बदली करण्यात आली होती. तेव्हापासून संचालक स्तरावरील अधिकारी ब्रजेश सिंह हे या पदाचा कारभार पाहत होते.

 

🤔 26 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील पहिल्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन केले ?

👉 उत्तरसिक्कीम

💁‍♀️ हे पण वाचा  

🔸 हे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालमधील सिलीगुडी जवळील सेवोकेला, सिक्कीम मधील रंगपोला जोडणार.

🔸 यासाठी 45 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग टाकण्यात येत असून त्यावर 14 बोगदे आणि 22 पूल असतील.

🔸 या ट्रेकची क्षमता 25 टन वजन उचलण्याची असेल.

🔸 यावरील गाड्या ताशी 110 किलोमीटर वेगाने धावतील.

 

👨‍🎨 राष्ट्रीय सुरक्षा रक्षक NSG चे महासंचालक म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

👉 उत्तरदलजीत सिंग चौधरी

🧐 हे पण वाचा

▪️ दलजीत सिंग चौधरी सध्या सशस्त्र सीमा बलचे डीजी म्हणून कार्यरत आहेत, आता ते NSG चे नेतृत्व करण्याची अतिरिक्त जबाबदारी खांद्यावर घेतील, ज्यांना सामान्यतः “ब्लॅक कॅट” म्हणून संबोधले जाते.

💁‍♂️ राष्ट्रीय सुरक्षा रक्षक – NSG विषयी

▪️ NSG ची स्थापना 16 ऑक्टोबर 1984 रोजी, ऑपरेशन ब्लू स्टारनंतर, दहशतवादी कारवायांचा मुकाबला करण्यासाठी आणि राज्याअंतर्गत अशांततेपासून संरक्षण करण्यासाठी करण्यात आली.

▪️ उच्च-जोखीम परिस्थिती हाताळण्यासाठी कठोरपणे प्रशिक्षित, NSG सरकारने मंजूर केलेल्या असाधारण परिस्थितीसाठी निवडकपणे तैनात केले जाते.

▪️ मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान एनएसजीच्या जलद आणि निर्णायक कृतींना व्यापक मान्यता मिळाली होती.

 

🔋 अलीकडेच भारतातील सर्वात मोठ्या ‘सोलर बॅटरी प्रोजेक्ट’चे अनावरण कोठे करण्यात आले ?

👉 उत्तर – छत्तीसगड

🧐 जाणून घ्या ‘या’ प्रोजेक्ट विषयी

▪️ SECI म्हणजेच सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने राजनांदगाव, छत्तीसगड येथे भारतातील सर्वात मोठ्या सोलर बॅटरी प्रोजेक्टचे अनावरण केले.

▪️ या प्रकल्पामध्ये द्विफेशियल सौर मॉड्यूल समाविष्ट आहेत, जे पारंपारिक मॉडेलपेक्षा अधिक ऊर्जा निर्माण करतात.

📝 प्रकल्पाशी संबंधित मुख्य मुद्दे

▪️ क्षमता –  40MW / 120MW BESS

▪️ सोलर पीव्ही प्लांट क्षमता – 152.325 मेगावॅट

▪️ डिस्पॅच क्षमता – 100 mW AC (155.02 mW पीक DC)

▪️ लाभार्थी राज्य – छत्तीसगड

 

📣 2022 आणि 2023 वर्षाचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार किती व्यक्तींना जाहीर झाले ?

👉 उत्तर92

💁‍♀️ हे पण पाहा

🔹 संगीत, नृत्य, नाट्यपरंपारिक तसेच आदिवासी संगीत, कटपुतली या क्षेत्रातील कलाकारांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते.

🔹 अशोक सराफ यांना 2022 साठीचा हा पुरस्कार देण्यात आला

🔹 संगीत नाट्य अकादमीच्या पुरस्कारामध्ये 2022 या वर्षासाठी शास्त्रीय संगीतातील अतलनिय योगदानासाठी ज्येष्ठ शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांना देखील हा पुरस्कार देण्यात आला.

🔹 तर 2023 साठी जेष्ठ शास्त्रीय गायिका कलापिणी कोमकली यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला.

🔹 1952 पासून अकादमी पुरस्कार प्रदान केले जातात

💵 पुरस्काराचे स्वरूप – १ लाख रुपये

 

👩‍✈️ आज BSF दलाची ‘पहिली महिला स्निपर’ म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?

👉 उत्तरसुमन कुमारी

🔫 मार्च 2024 मध्ये CSWT, इंदूर येथे आठ आठवड्यांचा स्निपर कोर्स पूर्ण करून सुमन कुमारीने ‘इन्स्ट्रक्टर ग्रेड’ प्राप्त केली. BSF उपनिरीक्षक सुमन कुमारी यांची सीमा सुरक्षा दलातील पहिली महिला स्निपर म्हणून निवड झाली.

💁‍♀️ भारतीय सशस्त्र दलातील इतर प्रमुख महिला

▪️ प्रेरणा देवस्थळी – कमांडर प्रेरणा देवस्थळी या भारतीय नौदलाच्या पश्चिम फ्लीटच्या युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.

▪️ दीपिका मिश्रा – दीपिका मिश्रा शौर्य पुरस्काराने सन्मानित होणारी भारतीय हवाई दलातील पहिली महिला अधिकारी ठरली.

▪️ शिवा चौहान – कॅप्टन शिवा चौहान हे फायर अँड फ्युरी कॉर्प्सचे अधिकारी आहेत. सर्वोच्च युद्धभूमी ‘कुमार पोस्ट’वर सक्रियपणे तैनात असलेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.

▪️ शालिझा धामी – 2023 मध्ये, ग्रुप कॅप्टन शालिझा धामी या फ्रंटलाइन कॉम्बॅट युनिटचे नेतृत्व करणारी पहिली महिला हवाई दल अधिकारी आहे.

 

🤷‍♀️ दरवर्षी आंतरराष्ट्रीय निःशस्त्रीकरण आणि अप्रसार जागृती दिवस केव्हा साजरा केला जातो

👉 उत्तर – 5 मार्च

🧐 या मागचा इतिहास

🔹 2021 मध्ये UNGA ने शांतता आणि सुरक्षिततेसाठी निःशस्त्रीकरण आणि अप्रसाराला प्रोत्साहन देण्यासाठी या दिवसाची स्थापना केली.

🔹 या संदर्भात, 7 डिसेंबर 2022 रोजी, संयुक्त राष्ट्र महासभेने एक ठराव मंजूर केला. तेव्हापासून दरवर्षी ५ मार्च हा “आंतरराष्ट्रीय नि:शस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिवस” ​​म्हणून घोषित केला जातो.

🔹 मोठ्या प्रमाणावर विनाशकारी शस्त्रांचे धोके आणि निःशस्त्रीकरण आणि अप्रसाराचे महत्त्व याबद्दल जागरुकता वाढवणे हा या दिवसामागचा मुख्य उद्देश आहे.

 

🤔 पहिला ‘आंतरराष्ट्रीय नि:शस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिवस’ कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला ? – 2023

🤔 मार्च 2024 मध्ये ‘संसद खेल महाकुंभ 3.0’ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला ?

👉 उत्तरलुह्नू क्रिकेट ग्राउंड बिलासपूर, हिमाचल प्रदेश

📝  5 मार्चला केंद्रीय मंत्री, अनुराग सिंह ठाकूर यांनी बिलासपूरच्या लुहनु क्रिकेट मैदानावर संसद खेल महाकुंभ 3.0 चे भव्य उद्घाटन केले.

👥 या संसद खेल महाकुंभच्या पहिल्या आवृत्तीत 40,000 लोक सहभागी झाले होते आणि दुसऱ्या आवृत्तीत 45,000 लोकांनी सहभाग घेतला होता. तर या तिसऱ्या आवृत्तीत 75,000 खेळाडूंच्या सहभागाचे लक्ष्य ठेवण्यात आले.

▪️ संसद खेल महाकुंभ 1.0 ची संस्था कोणत्या वर्षी सुरू झाली ? – 2018

▪️ संसद खेल महाकुंभ 2.0 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले ? – उत्तर प्रदेशातील बस्ती येथे

▪️ ‘संसद खेल महाकुंभ 3.0’ मध्ये किती खेळांचा समावेश करण्यात आला ? – पाच: व्हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, बास्केटबॉल आणि ऍथलेटिक्स

 

🧐 कोणती कोळसा खाण आशियातील सर्वात मोठी कोळसा खाण बनणार ?

📝 उत्तर – गेवरा खाण

✒️ हे पण वाचा

🔹 छत्तीसगडमध्ये कोल इंडियाची उपकंपनी असलेली गेवरा खाण आशियातील सर्वात मोठी कोळसा खाण बनणार आहे.

🔹 त्याची उत्पादन क्षमता सध्याच्या 52.5 दशलक्ष टनांवरून वार्षिक 70 दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्यासाठी याला अलीकडेच पर्यावरणीय मंजुरी मिळाली आहे.

 

💁‍♂️ मार्च 2024 मध्ये ‘इंडिया-यूके अचिव्हर्स’ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?

📝 उत्तर – झोया अख्तर आणि अस्मा खान

💁‍♂️ हे पण वाचा

🔸 झोया अख्तर आणि ब्रिटिश भारतीय शेफ अस्मा खान यांना लंडन येथे वार्षिक ‘इंडिया-यूके अचिव्हर्स’ पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.

🔸 आंतरराष्ट्रीय कार्यक्रम हाती घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या आणि माजी विद्यार्थ्यांच्या कामगिरीला हा पुरस्कार दिला जातो.

🔸 ‘इंडिया-यूके अचिव्हर्स’ दरम्यान प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या झोया अख्तर यांना लिव्हिंग लिजेंड अवॉर्डने सन्मानित करण्यात आले

🔸 हा पुरस्कार राष्ट्रीय भारतीय विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी संघ UK द्वारे दिला जातो

 

🤔 ‘इंडिया-यूके अचिव्हर्स’ पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू झाला ? – 2023

🦈 देशातील पहिल्या राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले ?

👉 उत्तर – पटना येथे

💁‍♀️ जाणून घ्या सविस्तर

▪️ बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ४ मार्च रोजी डॉल्फिनच्या संवर्धनावर संशोधन करणारे भारत आणि आशियातील पहिले राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान केंद्राचे उद्घाटन केले.

▪️ मुख्य उद्देश – हे संशोधन केंद्र डॉल्फिनचे वर्तन, नैसर्गिक अधिवास आणि मच्छिमारांना प्रशिक्षण देण्यासह संवर्धनाच्या उद्देशाने गंगेच्या डॉल्फिनचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी एक एकत्रीकरण बिंदू म्हणून काम करेल.

▪️ गंगा नदीतील डॉल्फिन ही जगातील चार गोड्या पाण्यातील डॉल्फिन प्रजातींपैकी एक आहे आणि ती भारत, बांगलादेश आणि नेपाळमध्ये आढळते.

▪️ केंद्र सरकारने 5 ऑक्टोबर 2009 रोजी डॉल्फिनला राष्ट्रीय जलचर प्राणी घोषित केले

 

🤷‍♀️ कोणता देश महिलांना गर्भपाताचा अधिकार देणारा जगातील पहिला देश ठरला ?

👉 उत्तर – फ्रान्स

📝 हे पण वाचा

▪️ काल ६ मार्चला देशाच्या राज्यघटनेत महिलांना गर्भपाताचा अधिकार देणारा फ्रान्स हा जगातील पहिला देश ठरला आहे

▪️ फ्रान्सच्या संसदेतील सदस्यांनी महिलांना ‘स्वातंत्र्याची हमी’ या १९५८ च्या कायद्यात ऐतिहासिक सुधारणा करण्यासाठी मतदान केले.

▪️ या विधेयकाला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी फ्रेंच राज्यघटनेच्या कलम ३४ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

▪️ फ्रान्समध्ये १९७५ पासून गर्भपात करणे कायदेशीर आहे. मात्र, हा अधिकार लोकांना राज्यघटनेतून हवा होता.

📌 फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष – इमॅन्युएल मॅक्रॉन

 

🤷‍♀️ भारतातील पहिल्या AI शिक्षिकेची निर्मिती कोणत्या शाळेत करण्यात आली ?

👉 उत्तर – तिरुअनंतपुरम

🧐 जाणून घ्या सविस्तर

▪️ आज ७ मार्चला केरळमधील तिरुअनंतपुरम येथील शाळेत भारतातील पहिल्या AI शिक्षिकेची निर्मिती करण्यात आली.

▪️ MakerLabs Edutech या कंपनीच्या सहकार्याने विकसित केलेल्या या AI शिक्षकाचे नाव आयरिस (Iris) असे आहे.

▪️ कडुवायिल थंगल चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने केटीसीटी उच्च माध्यमिक विद्यालयात या नव्या उपक्रमाचा वापर करण्यात आला.

▪️ आयरिस हे रोबोटिक्स आणि जनरेटिव्ह AI चे संयोजन आहे. या रोबोटमध्ये इंटेल प्रोसेसर आणि एक को-प्रोसेसर लावले आहे.

 

🚉 देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो सेवा कोठे सुरु होणार ?

👉 उत्तर – कोलकाता येथे

📝 हे पण वाचा

▪️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 6 मार्चला कोलकाता येथे भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन केले.

▪️ हि पहिली अंडरवॉटर मेट्रो हावडा मैदान आणि एस्प्लेनेड दरम्यान धावणार. ही मेट्रो हुगळी नदीखालून जवळपास १६.६ किलोमीटरचा प्रवास करणार असून ती हावडा शहराला सॉल्ट लेकशी जोडेल.

▪️ कोलकता मेट्रोच्या हावडा मैदान-एस्प्लेनेड विभागात हुगळी नदीखाली भारतातील पहिला वाहतूक बोगदा आहे

▪️ भारतातील पहिली आणि आशिया खंडातील पाचवी मेट्रोची सुरूवात कोलकाता येथे झाली होती

▪️ पाण्याखालील मेट्रोचा मार्ग जगात फक्त पॅरिस आणि लंडन येथे आहे

 

🤷🏻‍♂️ अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने देशातील पहिला सरकारी समर्थित oTT Platform लाँच केला ?

👉 उत्तर – केरळ सरकारने

🧐 पाहा याविषयी

▪️ काल ७ मार्च रोजी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या हस्ते भारताचे पहिले सरकारी-समर्थित OTT प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आले.

▪️ कैराली थिएटरमध्ये याचे लोकार्पण केले जाणार असून हे प्लॅटफॉर्म CSpace द्वारे तयार करण्यात आले आहे.

▪️ सांस्कृतिक कार्य मंत्री साजी चेरियन याच्या अध्यक्षस्थानी असतील. हे भारतातील पहिले सरकार समर्थित OTT प्लॅटफॉर्म आहे.

▪️ या प्लॅटफॉर्मचे उद्दिष्ट जनतेला अनुरूप माहितीपूर्ण आणि मनोरंजक सामग्री प्रदान करणे आहे.

 

🤔 CSpace म्हणजे काय ? – CSpace चे व्यवस्थापन केरळ स्टेट फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन द्वारे केले जाते जी मल्याळम सिनेमा आणि उद्योगाच्या प्रचारासाठी सोपवलेली एक सरकारी मालकीची कंपनी आहे

👱🏻‍♀️ दरवर्षी कोणत्या तारखेला ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा केला जातो ?

👉 उत्तर – 8 मार्च

📝 दरवर्षी 8 मार्च हा ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो. जागतिक स्तरावर महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस 1909 मध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली.

▪️ 2024 ची थीम – ‘Invest in Women: Accelerate Progress’

▪️ 2023 ची थीम – ‘Embrace Equity’ होती. याचा अर्थ लिंग समानतेकडे लक्ष देणे.

▪️ 2022 ची थीम – ‘सस्टेनेबल टुमॉरोसाठी आज लैंगिक समानता’ होती. ही थीम शाश्वत उद्यासाठी आज लैंगिक समानतेचा संदर्भ देते.

 

💁‍♂️ भारतात अलीकडे झालेल्या काही नियुक्त्या – परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे

▪️ भारत सरकारचे मुख्य जलतज्ञ –  लोचन सिंग पाठानिया

▪️ भारतीय लष्कर उपप्रमुख – लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी

▪️ भारताचे नवीन आरोग्य सचिव – अपूर्व चंद्र

▪️ आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवे अध्यक्ष –  नवाफ सलाम

▪️ भारतीय चार्टर्ड अकाउंट्स अध्यक्ष –  रणजित कुमार अग्रवाल

▪️ आय आर सी टी सी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक – संजय कुमार जैन

▪️ कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयामध्ये संचालक – तातुंग पाडी

▪️ महाराष्ट्र मुख्य निवडणूक आयुक्त – एस. चोकलिंघम

▪️ नविन लोकपाल – अजय माणिकराव खानविलकर

▪️ राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल महासंचालक – दलजीत सिंग चौधरी

 

निवडणूक आयोगाचे सदस्य म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

👉 उत्तर – ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांची

🧐 जाणून घ्या याविषयी आणखी

▪️ काल 14 मार्च रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय निवड समितीने भारताच्या निवडणूक आयोगामध्ये ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांची नवीन निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली.

▪️ भारत निवडणूक आयोग – भारतीय निवडणूक आयोग ही 25 जानेवारी 1950 रोजी घटनेच्या कलम 324 अन्वये स्थापन केलेली एक घटनात्मक संस्था आहे. त्यात मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नियुक्त करू शकणारे इतर सदस्य असतात.

▪️ सध्या भारत निवडणूक आयोगामध्ये तीन सदस्य आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आहेत अन्य निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी अलीकडेच आपल्या पदाचा राजीनामा दिला, तर अनुप पांडे १५ फेब्रुवारी २०२४ रोजी निवृत्त झाले.

▪️ सध्या ज्ञानेश कुमार सहकार मंत्रालयाचे सचिव म्हणून निवृत्त झाले तर, सुखबीर सिंग संधू उत्तराखंडचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले.

🧐 आज १५ मार्चला CBSE चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

👉🏻 उत्तर – राहुल सिंग यांची

📝 हे पण वाचा

🔹 केंद्र सरकारने 13 मार्च 2024 रोजी वरिष्ठ IAS अधिकारी राहुल सिंग यांची CBSE म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

🔹 याआधीचे CBSE चे अध्यक्ष ‘निधी छिब्बर’ यांना अलीकडेच NITI आयोगामध्ये सल्लागार बनवल्यामुळे निधी छिब्बर यांच्या जागी राहुल सिंग हे CBSE चे नवे अध्यक्ष बनले आहेत.

🔹 राहुल सिंग सध्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागात (DoPT) अवर सचिव आहेत. त्यामुळे आसाम-मेघालय केडरचे 1994 बॅचचे आयएएस अधिकारी एपी दास जोशी यांची राहुल सिंग यांच्या जागी डीओपीटीचे अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

🤷‍♀️ अलीकडेच रणजी चषक क्रिकेट स्पर्धा २०२३-२४ चे विजेतेपद कोणी जिंकले ?

👉🏻 उत्तर – मुंबई संघाने

📝 हे पण वाचा

🔸 मुंबई संघाने ४२ व्यांदा हे विजेतेपद पटकावले – तर उपविजेतेपद विदर्भाने पटकावले आहे.

🔸 मुंबई संघाने अजिंक्य रहाणे च्या नेतृत्वाखाली हे विजतेपद पटकावले.

🔸 तसेच रणजी चषक क्रिकेट स्पर्धा २०२३-२४ मध्ये तनुष कोटियन ला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे.

 

💁‍♀️ भारतातील पहिली व्यावसायिक सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सुविधा कोठे उभारली जाणार ?

👉🏻 उत्तर – गुजरात येथे

📝 हे पण वाचा

🔹 गुजरात मधील धोलेरा – ज्याला भारतातील सेमीकॉन शहर असे नाव देण्यात आले आहे.

🔹 तेथे टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड द्वारे भारत देशातील पहिली व्यावसायिक सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सुविधा उभारली जाणार.

 

💁‍♀️ जगातील सर्वात ताकदवान यान स्टारशिप ची यशस्वी चाचणी नुकतीच कोणत्या खाजगी अवकाश कंपनीने घेतली ?

👉🏻 उत्तर – SPACE X

📝 हे पण वाचा

🔹 जगातील सर्वात ताकदवान यान ‘स्टारशिप’ची तिसरी चाचणी यशस्वी झाली. ‘स्पेसएक्स’ या खासगी अवकाश कंपनीचे हे यान टेक्सासमधील बोका चिका प्रक्षेपण केंद्रावरून गुरुवारी सायंकाळी सहा वाजून ५५ मिनिटांनी अवकाशात झेपावले.

🔹 या स्टारशिप यानाची उंची ३९७ फूट आहे – याची चाचणी अमेरिकेतील टेक्सास येथील प्रक्षेपण केंद्रावरून घेतली.

🔹 या स्टारशिप मध्ये १५० टन वजन वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. भविष्यात अंतराळवीरांना चंद्र आणि मंगळावर घेऊन जाण्यासाठी या यानाचा वापर करण्याचे ‘स्पेसएक्स’चे उद्दिष्ट आहे.

 

🧐 मानव विकास निर्देशांक २०२२ मध्ये १९३ देशांच्या यादीत भारत देश कितव्या क्रमांकावर आहे ?

👉 उत्तर – १३४ व्या क्रमांकावर – तर प्रथम क्रमांकावर स्विझरलँड आहे. मानव विकास निर्देशांक UNDP संस्था जाहीर करते.

📝 इतर निर्देशांकामधे भारताचा क्रमांक

🔹 मानव विकास निर्देशांक २०२१ मध्ये – १३५ वा क्रमांक

🔹 मानव विकास निर्देशांक २०२२ नुसार भारताचे मूल्य  – ०.६४४

🔹 लैंगिक असमानता निर्देशांक २०२२ मध्ये भारताचा १९३ देशांच्या यादीत – १०८  वा क्रमांक

🔹 लैंगिक असमानता निर्देशांक २०२१ मध्ये – १२२ वा क्रमांक

👉🏻 UNDP च्या अहवालानुसार,

🔹 भारताचे एकून राष्ट्रीय उत्पन्न – ६,९५१ डॉलर

🔹 श्रमशक्तीच्या दरात महिलांचा सहभाग – २८.३  टक्के

🔹 श्रमशक्तीच्या दरात पुरुषांचा सहभाग – ७६.१ टक्के

 

🤷🏻‍♂️ अलीकडेच प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

👉 उत्तर – नवनीत कुमार सहगल यांची

👩‍🏫 हे पण वाचा

▪️ केंद्र सरकारने 15 मार्च 2024 रोजी नवनीत कुमार सहगल यांची प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

▪️ ए सूर्य प्रकाश यांच्या जागी नवनीत कुमार सहगल यांना हे पद मिळाले आहे. त्यानुसार नवनीत सहगल प्रसार भारतीचे सातवे अध्यक्ष बनले आहेत.

✍️ प्रसार भारती बद्दल

▪️ प्रसार भारती ही एक वैधानिक स्वायत्त संस्था आहे. ज्याची स्थापना प्रसार भारती कायदा, 1990 अंतर्गत 23 नोव्हेंबर 1997 रोजी झाली.

▪️ दूरदर्शन आणि आकाशवाणीला स्वायत्तता प्रदान करणे हा प्रसार भारती महामंडळाचा मुख्य उद्देश आहे.

▪️ आकाशवाणी (ऑल इंडिया रेडिओ – रेडिओ नेटवर्क) आणि दूरदर्शन (टेलिव्हिजन नेटवर्क) हे त्याचे प्रमुख घटक आहेत.

 

🏆 कॉर्पोरेट एक्सलन्स 2023 ET पुरस्कार जाहीर – परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे

🧐 15 मार्च 2024 रोजी मुंबईत कॉर्पोरेट एक्सलन्स 2023 साठी ET पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

🏦 यामध्ये भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, ला  ‘कंपनी ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

📝 पाहा संपूर्ण पुरस्काराची यादी

▪️ कंपनी ऑफ द इयर – स्टेट बँक ऑफ इंडिया

▪️ रिफॉर्मर ऑफ द इयर – भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

▪️ लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड  – एएम नाईक, अध्यक्ष एमेरिटस, लार्सन अँड टुब्रो

▪️ ग्लोबल इंडियन ऑफ द इयर – लीना नायर, सीईओ, चॅनेल

▪️ बिझनेस लीडर ऑफ द इयर – सीके वेंकटरामन, एमडी, टायटन

▪️ एंटरप्रेन्युअर ऑफ द इयर – रमेश जुनेजा, चेअरमन, मॅनकाइंड फार्मा आणि राजीव जुनेजा, व्हीसी आणि एमडी, मॅनकाइंड फार्मा

▪️ बिझनेसवूमन ऑफ द इयर – हिना नागराजन, सीईओ आणि एमडी, डियाजिओ इंडिया

▪️ कॉन्शियस कॉर्पोरेट ऑफ द इयर – HDFC बँक

▪️ इमर्जिंग कंपनी ऑफ द इयर – अदानी ग्रीन एनर्जी लि

 

🚁 भारतीय लष्कराने आपले पहिले अपाचे हेलिकॉप्टर स्क्वाड्रन नुकतेच कोठे उभारले ?

👉 उत्तर – जोधपूर येथे

जाणून घ्या याविषयी

👮‍♀️ भारतीय लष्कराने १५ मार्च २०२४ रोजी जोधपूरमध्ये अपाचे एएच-६४ अटॅक हेलिकॉप्टरने सुसज्ज असलेले पहिले अपाचे हेलिकॉप्टर स्क्वाड्रन उभारले.

🚚 भारतीय लष्कराचे एव्हिएशन कॉर्प ६ अपाचे हेलिकॉप्टर चालवणार आहे. सध्या भारतीय हवाई दल 22 Apache AH-64 अटॅक हेलिकॉप्टर चालवते.

🧐 अपाचे हेलिकॉप्टर विषयी

▪️ अपाचे हेलिकॉप्टर, ज्याला ‘हवेतील टाक्या’ देखील म्हणतात, हे अमेरिकन कंपनी बोईंगद्वारे निर्मित सर्वात प्रगत लढाऊ हेलिकॉप्टरपैकी एक आहे. हेलिकॉप्टरचा कमाल वेग 280 किमी/तास आहे.

▪️ Apache हेलिकॉप्टर AH-64E मध्ये प्रगत नाईट व्हिजन सिस्टीम आणि एका मिनिटात 138 लक्ष्यांवर मारा करण्याची क्षमता असलेली क्षेपणास्त्रे आहेत.

▪️ हेलिकॉप्टर AGM 114 हेलफायर अँटी-टँक क्षेपणास्त्रांनी सशस्त्र आहे जे टँकसारख्या चिलखती वाहनांना नष्ट करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

 

🤷🏻‍♂️ नुकतेच जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटनासाठी जमीन खरेदी करणारे पहिले राज्य कोणते ठरले ?

👉 उत्तर – महाराष्ट्र

🧐 हे पण वाचा

▪️ काल १७ मार्चला महाराष्ट्राने जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात 2.5 एकर जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.

▪️ जम्मू-काश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी महाराष्ट्र सरकार या जमिनीवर गेस्ट हाउस – राज्य भवन बांधणार आहे. हे राज्य भवन 8.16 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे .

▪️ राज्य सरकार पर्यटक आणि भाविकांसाठी दोन महाराष्ट्र भवन बांधणार असून यापैकी एक श्रीनगरमध्ये तर दुसरे अयोध्येत बांधण्यात येणार आहे.

 

🤔 भारतातील पहिले इनडोअर ॲथलेटिक्स सेंटर अलीकडे कोठे सुरू झाले ?

👉 उत्तर – भुवनेश्वर येथे

📝 इनडोअर ॲथलेटिक्स सेंटर विषयी

🔹 भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियममध्ये १६ मार्चला मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या हस्ते भारतातील पहिल्या इनडोअर ॲथलेटिक्स सेंटरसह अत्याधुनिक इनडोअर एक्वाटिक सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.

🔹 या इनडोअर ॲथलेटिक्स सेंटरमध्ये तापमान नियंत्रित 50 मीटर ऑलिम्पिक आकाराचा जलतरण तलाव आणि 1000 प्रेक्षकांच्या आसनक्षमतेसह 25 मीटर वार्म अप पूल आहे.

🔹 यामध्ये फिटनेस सेंटर, स्पोर्ट्स रिकव्हरी सुविधा आणि २६ जुळ्या शेअरिंग रूम्ससह निवास सुविधा आहे.

 

💁‍♀️ अलीकडेच राजस्थान शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

👉 उत्तर – सीआर चौधरी यांची

📝 राजस्थान सरकारच्या इतर नियुक्त्या

▪️ सैनिक कल्याण सल्लागार समितीचे राज्यस्तरीय अध्यक्ष – माजी आमदार प्रेमसिंग बाजौर

▪️ देवनारायण मंडळाचे अध्यक्ष – ओमप्रकाश भडाना

▪️ सैनिक मंडळाचे अध्यक्ष – राज्यपाल/मुख्यमंत्री  – कलराज मिश्र / भजनलाल शर्मा

▪️ कला मंडळाचे अध्यक्ष – प्रल्हाद टांक

▪️ राजस्थान राज्य अनुसूचित जाती वित्त आणि विकास आयोगाचे अध्यक्ष – राजेंद्र नायक

▪️ विश्वकर्मा कौशल्य विकास मंडळाचे अध्यक्ष – रामगोपाल सुथार

▪️ अमृता देवी / जीव जंतू कल्याण मंडळाचे अध्यक्ष – जसवंत बिश्नोई

🧐 रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ऐतिहासिक पाचव्यांदा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला.

📝 75% मतांची मोजणी केल्यानंतर, रशियाच्या निवडणूक आयोगाने पुतीन 87.14% मतांसह आघाडीवर असल्याचे म्हटले आहे. तर दुसरे स्थान कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार निकोलाई खारिटोनोव्ह यांना मिळाले.

🇷🇺 रशिया बद्दल

▪️ रशिया, जगातील सर्वात मोठा देश आहे, तो पृथ्वीच्या एकूण भूमी वस्तुमानाच्या एक दशांश भाग व्यापतो.

▪️ अधिकृत नाव – रशियन फेडरेशन

▪️ सरकारचे स्वरूप – फेडरेशन

▪️ राजधानी – मॉस्को

▪️ अधिकृत भाषा – रशियन

▪️ चलन – रूबल

▪️ प्रमुख पर्वतरांगा – उरल, अल्ताई

▪️ प्रमुख नद्या – अमूर, इर्तिश, लेना, ओब, व्होल्गा, येनिसे

🤷‍♀️ महिला प्रीमियर लीग 2024 चे विजेतेपद नुकतेच कोणत्या संघाने जिंकले ?

👉🏻 उत्तर – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB)

📆 17 मार्च 2024 रोजी झालेल्या महिला प्रीमियर लीग 2024 च्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ने दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव करून अंतिम सामना जिंकला. हा अंतिम सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता.

📝 WPL 2024 फायनल नंतर दिलेले पुरस्कार

▪️ विजयी संघ – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

▪️ उपविजेता संघ  – दिल्ली कॅपिटल्स

▪️ सर्वोत्तम गोलंदाज – श्रेयंका पाटील

▪️ सामनातील पॉवरफुल स्ट्रायकर – शफाली वर्मा

▪️ कॅच ऑफ द सीझन – सजीवन सजना 

▪️ सामन्यातील षटकार – शफाली वर्मा

▪️ सामनावीर – सोफी मोलिनक्स

▪️ पॉवरफुल स्ट्रायकर ऑफ द सीझन – जॉर्जिया वेअरहॅमला

▪️ सीझनचे षटकार – शफाली वर्मा

▪️ इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन – श्रेयंका पाटील

▪️ फेअरप्ले पुरस्कार – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

▪️ पर्पल कॅप – श्रेयंका पाटील

▪️ ऑरेंज कॅप – एलिस पेरी

▪️ मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीझन – दीप्ती शर्माला

 

🤷🏻‍♂️ दरवर्षी कोणत्या तारखेला ‘आंतरराष्ट्रीय आनंद दिन’ साजरा केला जातो ?

👉 उत्तर – 20 मार्च ला

🧐 जागतिक आनंद आणि कल्याण यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 20 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय आनंद दिन साजरा केला जातो.

✍️ आंतरराष्ट्रीय आनंद दिन 2024 ची थीम – “आनंदासाठी रीकनेक्टिंग: बिल्डिंग रेझिलिएंट कम्युनिटीज”

👩‍🏫 आंतरराष्ट्रीय आनंद दिनाचा इतिहास

🔹 UNGA द्वारे 2012 मध्ये जीवनातील आनंदाचे महत्त्व आणि लोकांना आनंदी करण्याचे मार्ग ओळखण्यासाठी घोषित केले गेले. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, हा प्रस्ताव भूतानने सुरू केला होता.

🔹 12 जुलै 2012 रोजी, UNGA ने 20 मार्च हा आंतरराष्ट्रीय आनंद दिन म्हणून घोषित करणारा ठराव संमत केला. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी 20 मार्च रोजी साजरा केला जातो. 2013 मध्ये पहिला ‘आंतरराष्ट्रीय आनंद दिन’ साजरा करण्यात आला

🤷‍♀️ नेपाळची नवीन पर्यटन राजधानी कोणती झाली ?

👉 उत्तर – पोखरा

📝 17 मार्च रोजी, बाराही घाट येथे एका समारंभात, नेपाळ सरकारने अधिकृतपणे पोखरा देशाची पर्यटन राजधानी म्हणून घोषित केले.

💁‍♂️ पोखरा बद्दल – पोखरा हे शहर आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि प्रसन्न वातावरणासाठी प्रसिद्ध आहे, येथे फेवा तलाव, अन्नपूर्णा पर्वतरांगा आहेत.

🔹 तसेच पोखरा हे अन्नपूर्णा सर्किट आणि जोमसोम ट्रेक सारख्या लोकप्रिय ट्रेकिंग मार्गांचे प्रवेशद्वार देखील आहे, तर बिंध्यवासिनी मंदिर आणि वर्ल्ड पीस पॅगोडा यासारख्या सांस्कृतिक आकर्षणे या प्रदेशाच्या समृद्ध वारशाची झलक देतात.

👉🏻 नेपाळ बद्दल – नेपाळ हा दक्षिण आशियातील चीन आणि भारत यांच्यामधील देश आहे.

🔹 सरकारचे स्वरूप – फेडरल लोकशाही प्रजासत्ताक

🔹 राजधानी – काठमांडू

🔹 चलन – नेपाळी रुपया

🔹 प्रमुख पर्वतरांगा – हिमालय, अन्नपूर्णा

🔹 प्रमुख नद्या – कर्णाली, कोशी

 

🤔 ऑल इंडिया रेडिओ चे महासंचालक म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

👉 उत्तर – मौसमी चक्रवर्ती यांची

📝 माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2024 मध्ये AIR अर्थात ऑल इंडिया रेडिओ चे महासंचालक (न्यूज) म्हणून मौसमी चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे – मौसमी चक्रवर्ती वसुधा गुप्ता यांची जागा घेतील.

🎼 आकाशवाणी बद्दल

⚫ जून 1923 मध्ये , रेडिओ क्लब ऑफ बॉम्बेने देशात पहिले प्रसारण केले.

⚫ स्वातंत्र्याच्या वेळी भारतात एकूण सहा रेडिओ केंद्रे होती.

 

👩‍💻 केंद्र सरकारचे प्रवक्ते म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

👉🏻 उत्तर – शेफली बी शरण यांची

📝 17 मार्च 2024 रोजी, वरिष्ठ भारतीय माहिती सेवा अधिकारी शेफली बी शरण यांची केंद्र सरकारचे प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली.

👱🏻‍♀️ याआधी मनीष देसाई हे केंद्र सरकारचे प्रवक्ते होते – शेफली बी शरण या PIB च्या PDG बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत तर, PIB च्या प्रमुख बनणाऱ्या 5व्या महिला अधिकारी आहेत.

✍️ प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो बद्दल

▪️ प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ही भारत सरकारची नोडल एजन्सी आहे – जी सरकारी धोरणे, कार्यक्रम, उपक्रम तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाबद्दल माहिती गोळा करते.

▪️ यामध्ये देशातील विविध भागातील सुमारे 8,400 वृत्तपत्रे आणि माध्यम संस्थांना माहिती वितरित केली जाते.

▪️ 1920 च्या उत्तरार्धात या सेलचे नाव बदलून ‘सेंट्रल ब्युरो ऑफ इन्फॉर्मेशन’ असे करण्यात आले होते.

▪️ त्यांनतर 1946 मध्ये या संस्थेचे नाव बदलून प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो असे करण्यात आले आहे.

 

📣 स्विझरलँड मधील IQ एयर संस्थेचा जागतिक अहवाल जाहीर – जाणून घ्या सर्वाधिक प्रदुषित देशाच्या यादीत भारत कितव्या क्रमांकावर ?

👉🏻 उत्तर – या अहवालानुसार २०२३ मध्ये जगातील सर्वाधिक १३४ प्रदुषित देशाच्या यादीत भारत ३ ऱ्या क्रमांकावर आहे.

📝 स्विझरलँड मधील IQ एयर संस्थेच्या २०२३ च्या अहवालानुसार,

▪️ जगातील सर्वाधिक प्रदुषित शहर – बिहार राज्यातील, बेगुसराय

▪️ जगातील सर्वाधिक प्रदुषित राजधानी – नवी दिल्ली

▪️ जगातील सर्वाधिक प्रदुषित देश – बांगलादेश

▪️ महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक प्रदुषित शहर – भिवंडी

 

🤷‍♀️ आज इंडियन स्टील असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली ?

👉 उत्तर – नवीन जिंदाल यांची

🧐 प्रख्यात उद्योगपती आणि माजी संसद सदस्य नवीन जिंदाल यांची काल २१ मार्च रोजी इंडियन स्टील असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

📝 याआधी दिलीप ओमन, सीईओ, AMNS इंडिया आणि कार्यकारी उपाध्यक्ष, आर्सेलर मित्तल निप्पॉन हे अध्यक्ष होते.

✍️ नवीन जिंदाल बद्दल 

▪️ नवीन जिंदाल सध्या जिंदाल स्टील अँड पॉवरचे अध्यक्ष आहेत, 2004 आणि 2009 मध्ये ते हरियाणाच्या कुरुक्षेत्र मतदारसंघातून लोकसभा सदस्य म्हणूनही निवडून आले आहेत.

🍴 इंडियन स्टील असोसिएशन बदल

▪️ इंडियन स्टील असोसिएशनची स्थापना 2014 मध्ये भारतातील पोलाद उत्पादक कंपन्यांची सर्वोच्च संस्था म्हणून करण्यात आली.

▪️ पहिला आधुनिक स्टील प्लांट जमशेटजी नुसेरवानजी टाटा यांनी उभारला. त्यांनी टाटा आयर्न अँड स्टील कंपनी (आताची टाटा स्टील) ची स्थापना 1907 मध्ये केली आणि जमशेदपूर, झारखंड येथे तिचा कारखाना सुरू केला.

 

💁‍♂️ मार्च 2024 मध्ये कोणत्या कंपनीला मिनीरत्न श्रेणी-I सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइझ (CPSE) चा दर्जा देण्यात आला ?

👉 उत्तर – ग्रिड कंट्रोलर ऑफ इंडिया लिमिटेड (ग्रिड-इंडिया)

🧐 हे पण पाहा

📝 20 मार्च 2024 रोजी ग्रिड कंट्रोलर ऑफ इंडिया लिमिटेड (GRID-India) ला मिनीरत्न श्रेणी-I सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइझ (CPSE) चा दर्जा देण्यात आला.

🗣️ ग्रिड कंट्रोलर ऑफ इंडिया लिमिटेडची स्थापना 2009 झाली  – GRID-India पूर्वी ‘पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड’ (POSOCO) म्हणून ओळखले जात असे. POSOCO चे नवीन नाव 9 नोव्हेंबर 2022 पासून ग्रिड-इंडिया असे करण्यात आले.

🏣 भारतात सध्या 13 महारत्न कंपन्या आहेत

 

💁‍♀️ नुकताच न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने अणुऊर्जेचा शांततापूर्ण वापर वाढवण्यासाठी कोणासोबत करार केला ?

👉 उत्तर – नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC)

🧐 या करारावर 21 मार्च 2024 रोजी नवी दिल्ली येथे NCC चे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग आणि NPCIL कार्यकारी संचालक BVS शेखर यांनी स्वाक्षरी केली.

📝 करारातील मुद्दे – NPCIL या उपक्रमात NCC कॅडेट्सना शिक्षण देणार आहे. या सामंजस्य करारामुळे कॅडेट्सना देशभरातील विविध NPCIL सुविधांना भेट देण्याची संधी मिळेल.

✍️ NCC बद्दल – नॅशनल कॅडेट कॉर्प्स ही भारतीय सशस्त्र दलाशी संलग्न युवा संघटना म्हणून काम करते. NCC ची स्थापना 1948 मध्ये झाली असून

याचे मुख्यालय नवी दिल्ली आहे. NCC मध्ये आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सचा समावेश आहे,

✍🏻 न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड बद्दल – न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची स्थापना कंपनी कायदा 1956 अंतर्गत सप्टेंबर 1987 मध्ये झाली असून याचे मुख्यालय मुंबई येथे आहे.

 

🤔 भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो प्राप्त करणारे पहिले परदेशी नेते कोण ठरले ?

👉 उत्तर –  पंतप्रधान नरेंद्र मोदी

📆 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल 22 मार्च रोजी भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी ‘ ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो’ प्रदान केला होता

📝 भूतानची राजधानी थिम्पू येथील ताशिचो जोंग पॅलेस येथे आयोजित एका समारंभात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

🧐 या परस्काराबद्दल – ‘ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारत-भूतान संबंधांना पुढे नेण्यात दिलेल्या योगदानाबद्दल आणि भूतान राष्ट्र आणि लोकांसाठी त्यांच्या विशिष्ट सेवेबद्दल प्रदान करण्यात आला.

👉 भूतान बद्दल – भूतान, ज्याला ड्रुक युल देखील म्हणतात , याचा *अर्थ “थंडर ड्रॅगनची भूमी आहे. भूतान हा दक्षिण आशियातील भूपरिवेष्टित देश आहे. भारत आणि चीन यांच्याशी आंतरराष्ट्रीय सीमा सामायिक केल्या आहेत.

▪️ आसाम, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या चार भारतीय राज्यांची भूतानशी जमीन सीमा आहे. भूतानशी भारताची आंतरराष्ट्रीय सीमेची लांबी ६९९ किमी आहे.

▪️ राजधानी – थिंफू

▪️ चलन – नागुलट्रम

▪️ भूतानमध्ये बोलली जाणारी भाषा- झोंगखा

▪️ पंतप्रधान – शेरिंग तोबगे

 

Leave a Comment